• Tue. Jun 9th, 2026

    Radhakrishna Vikhe Patil : ‘रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड’, विखे पाटलांची बोचरी टीका

    Radhakrishna Vikhe Patil : ‘रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड’, विखे पाटलांची बोचरी टीका

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका केली. रोहित पवार यांची स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक शब्दांत टीका केली. “रोहित पवारांचं एवढं मनावर घेण्याचं कारणच नाही. ही लढाई शेतकऱ्यांसाठी नसून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे”, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला.

    “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५ हजार कोटींची कर्जमाफी करत मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या असतील तर सरकार त्यावर कार्यवाही करेल. कोणाच्या आंदोलनामुळे नव्हे, तर दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ही कर्जमाफी देण्यात आली आहे”, असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या NDAच्या मागणीवर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार पलटवार करत विरोधकांवरच निशाणा साधला. “NDAमध्येच मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. आधी त्यांनी स्वतःचं घर सांभाळावं, त्यांच्या पक्षातील लोकच राजीनामे देत आहेत”, असा टोला विखेंनी लगावला.

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी NEET घोटाळा, कोचिंग क्लासेस आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शोषणाचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला. “मी सुरुवातीपासून कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणण्याची मागणी करत होतो. त्यावेळी माझ्यावर टीका झाली, अनेकजण हसत होते. मात्र नीट पेपरफुटीनंतर सगळ्यांची तोंडं बंद झाली आहेत”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    “गरीब विद्यार्थ्यांचं फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं आणि आता या कोचिंग माफियाचं पितळ उघड पडलं आहे. NEET प्रकरणात CBI चौकशी सुरू असून महाराष्ट्रातील काही मोठे क्लास चालकही रडारवर आहे”, असं त्यांनी सांगितलं.

    कोचिंग क्लासेसवर नियमावली आणण्याची मागणी

    “धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्रात जाऊन क्लासेस सुरू करा असं कुठे सांगितलं होतं? केंद्राची परीक्षा व्यवस्था सक्षम आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर CBI कारवाई करेल. पण आता कोचिंग क्लासेसवर कठोर नियमावली आणणं अत्यावश्यक आहे. फार काळ डोळेझाक करून चालणार नाही, त्यांना वठणीवर आणावंच लागेल”, असा इशाराही विखेंनी दिला.

    “जलसंपदा विभागाच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरही विखेंनी भूमिका स्पष्ट केली. मी स्वतः अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. त्यांचं समाधान झालं आहे. जे स्थलांतर होणार आहे ते होणारच. काही कर्मचारी वर्गाला तात्पुरती सवलत हवी होती, ती सरकारने दिली आहे”, असं त्यांनी सांगितलं.

    यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं. “भंडारदरा धरण जिथे आहे तिथेच प्रशासनिक व्यवस्था असणं गरजेचं आहे. नगरमध्ये कार्यालय ठेवून उपयोग नाही. निर्णय घेताना अडचणी येतात. पण सरकार सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहे. कोणावरही अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही”, असं विखे पाटील म्हणाले.

    ‘जरांगेंना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही’

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानलेले आभार यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे यांनी केलेल्या बहुतांश मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. उर्वरित मागण्यांवरही कार्यवाही सुरू आहे. पुन्हा समाजासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यामुळेच मनोज जरांगेही समाधानी आहेत”, असं विखे पाटील म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा