• Fri. Jun 12th, 2026
    एका महिन्यात ६० टक्के शेतकऱ्यांची संमती, पुंरदरमध्ये भूसंपादनाला वेग; ३,००० एकर क्षेत्रावर उभारणार विमानतळ

    New Pune Airport: सात मेपासून पुरंदर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. हे काम सध्या वेगाने सुरू असून सात गावांमधील साठ टक्के शेतकऱ्यांनी समंतीही दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुरंदर विमानतळासाठी जमीन देण्याकरिता चांगला प्रतिसाद मिळत असून, १२१६ हेक्टरपैकी ७३५ हेक्टर क्षेत्र जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत. अवघ्या एका महिन्यात ६० टक्के शेतकऱ्यांची संमती मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत ९०० कोटी रुपये वितरित केले असून, संमती देण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत आहे.

    सातही गावांमध्ये प्रक्रिया सुरू

    पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या गावांतून १२१६ हेक्टर अर्थात तीन हजार एकर क्षेत्र विमानतळासाठी संपादित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. पॅकेज जाहीर केल्यानंतर सात मेपासून संमतीपत्रे देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयासह सासवड येथील उपविभागीय कार्यालयात प्रशासनाने प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai Airport: नव्या कोस्टल रोडने मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 5 मिनिटांत, पनवेल, ठाण्याहूनही रस्ता; प्रवास सुस्साट होणार

    शेतकऱ्यांकडून १२१६ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्यापैकी एका महिन्यात ७३५ हेक्टर क्षेत्राची संमती शेतकऱ्यांनी दिली आहे. जमिनींचा ‘सर्च रिपोर्ट’ला वेळ लागत आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने पाच वकिलांचे एक पथक नियुक्त केले आहे. सात गावांतील अनेक जमिनींचे दावे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

    “पुरंदर विमानतळासाठी एका महिन्यात ७३५ हेक्टर क्षेत्रासाठी संमती देण्यात आली असून, संमतीची पक्रिया वेगाने सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना माधान्याने त्यांचा मोबदला दिला आहे,” अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

    संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची स्थिती

    पुरंदर जिल्ह्यातील एकूण सात गावांमध्ये पुरंदर विमानतळ उभारलं जाणार आहे. खानवडी गावामधील २६० शेतकऱ्यांची १५०.८८ हेक्टर जमीन, एखतापूरमधील २९८ शेतकऱ्यांची १४६.५० हेक्टर जमीन, वनपुरीमधील २६५ शेतकऱ्यांची ११८.४५६० हेक्टर जमीन , कुंभारवळणातील २५० शेतकऱ्यांची ११२ हेक्टर जमीन, पारगावमधील ५८० शेतकऱ्यांची १००.४२ हेक्टर जमीन, मुंजवडीतील १७५ शेतकऱ्यांची ६५ हेक्टर जमीन आणि उदातीवाडीतील ५९ शेतकऱ्यांची ४२ हेक्टर जमीन अशा एकूण १८८७ शेतकऱ्यांनी संमती दिली असून ७३५.२५ हेक्टर जमीन मिळाली आहे. सात मेपासून सुरू झालेल्या या भूसंपादन प्रक्रियेद्वारे १२१६ हेक्टर जमीन संपादित करण्याचं उद्दिष्ट आहे.

    Maharashtra TimesPune Miraj Railway: पुणे-मिरज रेल्वेमार्गावर 21 दिवसांचा मेगाब्लॉक; ‘वंदे भारत’सह अनेक गाड्यांचे नियोजन बदलले, पाहा वेळापत्रक

    या प्रकल्पासाठी राज्य सरकारने हुडकोकडून ६००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. शेतकऱ्यांनी प्रतिएकर १.६१ कोटी रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या जमिनींवरील घरं, फळबागा किंवा बोअरवेल बाधित होत असतील तर शेतकऱ्यांना जमिनीची किंमतीच्या चौपट म्हणजे दोन कोटी रुपये रक्कम मोबदल्यात मिळणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा