• Sun. Jun 14th, 2026
    पुण्याच्या वेशीवर हाऊस पार्टीचे कल्चर, पोलिसांपासून वाचण्यासाठी कमालीची गुप्तता, फक्त 5 तास आधी लोकेशन जाहीर

    Pune House Party : ​तुळापूर येथील ‘प्रोजेक्ट एक्स’ अल्कोहोल पार्टीच्या आयोजकांनी सुरुवातीला केवळ कार्यक्रमाची जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली होती. परंतु पार्टी नेमकी कुठे होणार, याची माहिती जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : शहरातील पब, बार आणि हॉटेल्सवरील कारवाईची तीव्रता वाढल्याने आता शहराबाहेरील फार्महाउस, रिसॉर्ट्स आणि खासगी बंगल्यांमध्ये ‘अल्कोहोल पार्टी’ आणि ‘हाउस पार्टी’ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. तुळापूर येथील ‘प्रोजेक्ट एक्स’ प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, तुळापूरसह वाघोली, मुळशी, पवना आणि लोणावळा परिसर अशा कार्यक्रमांसाठी पसंतीची ठिकाणे बनत असल्याची चर्चा सुरू आहे.

    आयोजकांचा पुण्यातील ग्रामीण भागांकडे मोर्चा

    गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलिसांनी शहरातील पब, रुफटॉप रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्समधील नियमभंगाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. त्यामुळे शहराच्या हद्दीत उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम आयोजित करणे अवघड झाले आहे. परिणामी, आयोजकांनी शहरालगतच्या ग्रामीण भागातील एकांतस्थळी असलेल्या फार्महाउस, रिसॉर्ट्स आणि खासगी मालमत्तांकडे मोर्चा वळवल्याचे बोलले जात आहे.

    उशिरापर्यंत कार्यक्रमांची सुविधा

    तुळापूर, वाघोली, मुळशी, पवना धरण परिसर आणि लोणावळा या भागांत मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट्स, व्हिला आणि फार्महाऊस उपलब्ध आहेत. शहरापासून तुलनेने कमी अंतर, प्रशस्त जागा आणि रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा यामुळे या ठिकाणांना प्राधान्य दिले जात असल्याचे समोर येत आहे.
    Maharashtra TimesPune Blast : गॅसगळतीनंतर चिमुरड्या निहारिकाचा आरडाओरडा, पहिल्या मजल्यावरुन उडी मारत जीव वाचवला, वडील, आजी-आजोबांचा अंत

    पाच तास आधी लोकेशन शेअर

    तुळापूर येथील ‘प्रोजेक्ट एक्स’ अल्कोहोल पार्टीच्या आयोजकांनी सुरुवातीला केवळ कार्यक्रमाची जाहिरात सोशल मीडियावर केली होती. मात्र, पार्टी नेमकी कुठे होणार, याची माहिती जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अवघ्या पाच तासांपूर्वीच संबंधित ठिकाणाचे लोकेशन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, ऐन शिवराज्याभिषेकदिनी तुळापुरात ही पार्टी आयोजित केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

    Supriya Sule On Cockroach Janata Party | कॉकरोच जनता पार्टीच्या भूमिकेवरून थेटच बोलल्या

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामसह विविध समाजमाध्यमांवर ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने कार्यक्रमाची प्रसिद्धी केली होती. पार्टीच्या आयोजनासाठी वापरण्यात आलेली सोशल मीडिया खाती, डिजिटल व्यवहार आणि सहभागींपर्यंत पोहोचविण्यात आलेले संदेश यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे.

    तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी; तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांतील उच्चशिक्षित तरुण-तरुणी सहभागी होत असल्याचे आढळून आले आहे.
    Maharashtra TimesDelhi Fire : बाथरुममध्ये टॉवेल अंथरले, शॉवर सुरु करुन निपचित पडले… रीलमुळे दिल्लीतील आगीतून जोडप्याचे प्राण वाचले
    पोलिसांनी आयोजक, फार्महाउसचा मालक, दारूपुरवठा करणारे, बाउन्सर, लाइट आणि साउंड सिस्टीमशी संबंधित व्यक्तींची माहिती संकलित केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आले. काही व्यक्तींना वैद्यकीय चाचण्यांनंतर नोटीस बजावून सोडल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा