• Mon. Sep 14th, 2026

Kolhapur | करवीर छत्रपतींचा डोळे दिपवणारा न्यू पॅलेस, 1880 च्या दशकातील राजवाड्याचं वैशिष्ट्य काय?

Kolhapur | करवीर छत्रपतींचा डोळे दिपवणारा न्यू पॅलेस, 1880 च्या दशकातील राजवाड्याचं वैशिष्ट्य काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#kolhapur #newpalace #chhatrapatishivrajybhisheksohala #indrajeetsawantकोल्हापूरच्या ऐतिहासिक नवीन राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.. अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक शाही थाटात हा सोहळा.. सनई-चौघड्यांच्या सुरावली, पारंपरिक आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या शिवछत्रपतींच्या सुवर्णमूर्तीची राजवाड्याच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या ठिकाणी छत्रपती घराण्याच्या धार्मिक विधींनुसार, मंत्रोच्चारात आणि शाही पद्धतीनुसार सुवर्णमूर्तीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *