• Wed. Jun 10th, 2026
    Ratnagiri News: झोपेत सर्पदंशाने आईचा दुर्दैवी मृत्यू; दिप्ती काजरेकर यांच्या जाण्याने दोन मुलं पोरकी, रत्नागिरी सुन्न

    रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील गव्हे गावात झोपेत सर्पदंश झाल्याने ४५ वर्षीय दिप्ती काजरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोकणात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात अनेकदा सर्पदवशाने मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत .अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील गव्हे या गावी घडली आहे. 45 वर्षीय विवाहित महिलेचा झोपेत सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. गव्हे येथील दिप्ती जितेंद्र काजरेकर (वय 45) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

    नेमकी कशी घडली दुर्दैवी घटना

    आपल्या कुटुंबासमवेत झोपेत असतानाच विषारी सापाने दंश केला यामुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना तातडीने दापोली येथील भागवत हॉस्पिटल येथे हलवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टर नसल्याने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून दोन मुलांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले आहे.

    होतकरु, उच्चशिक्षित महिला अशी ओळख

    रत्नागिरी येथे माहेर असलेल्या दिप्ती काजरेकर यांचे सासरी गव्हे येथे घरी दुकान होते. त्या उच्चशिक्षित होत्या इतकच नाही तर त्यांना लोकरीच्या हस्त कौशल्याचेही उत्तम ज्ञान होते. लोकरीपासून तोरणही त्या बनवत असत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र किरण करमरकर आणि सुरेश खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देत सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित नागाला सुरक्षितरीत्या पकडून त्याचे रेस्क्यू केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

    दोन मुले पोरकी

    दिप्ती काजरेकर यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे, दीर तसेच अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे गव्हे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी दिपक भिकू बेनेरे यांनी फिर्याद दिली आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी श्री. नलावडे करीत आहेत

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा