• Sun. Jul 26th, 2026

    खोडशी धरणाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 26, 2026
    खोडशी धरणाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    सातारा दि. २६:  कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे  बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण असलेले काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले

    मंत्री विखे पाटील यांनी खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी केली. याप्रसंगी आमदार धैर्यशील कदम, अतुल भोसले, मनोज घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

    कराड येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आज खोडशी धरणाला भेट दिली. या धरणाचे काम बऱ्याच वर्षापासून अपूर्ण आहे या कामाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व मार्च 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल.

    या धरणाच्या कालव्यामधून गटाराचे व कचरा मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरी व शेतामध्ये जात आहे याचा त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे हा कालवा बंदिस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

    यानंतर मंत्री विखे पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट देऊन या योजनेची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed