Jalgaon Varangaon Accident Four People Death : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच जळगावातील वरणगावजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
जळगाव वरणगाव अपघात चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिल्यान हा अपघात घडला. मलकापूर येथील आदिवासी कुटुंबातील विजय शंकर काळे (वय 19), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14) व मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय 1 वर्ष) हे दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात असताना गावाच्या पुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले.
नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर सर्व जखमींना जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आप्तस्वकीयांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात हंबरडा फोडत नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, जळगाव पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची विचारपूस करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. Pune Nasrapur Case : भीमराव कांबळेचे जनावरासोबत अनैसर्गिक कृत्य, कोर्टात साक्ष; मंदिरात लपवलेल्या वस्तूंची जागा व्हिडिओ कॉलवर दाखवली
जळगाव बोरखेडा हत्याकांड 2020
जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता.रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांची हत्या तसेच बालिकेवर अत्याचार प्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला दोषी ठरवत गुरुवारी (दि. ४) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भुसावळ येथे सेशन न्यायालय झाल्यानंतर बारा वर्षांत पहिल्यांदाच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवर न्यायालयाने मुख्य आरोपीला कलम ३०२ आणि ३७६ अंतर्गत दुहेरी फाशी सुनावली. Pune Water Cut: जून महिन्यात पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट, एक दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता; मान्सूनवर ‘एल निनो’चं सावट
…अशी घडली होती घटना
ही घटना १६ ऑक्टोबर २०२० रोजी उघडकीस आली होती. बोरखेडा येथील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी मध्य प्रदेशात गेले असताना घरात सविता (वय १३), राहुल (वय ११), अनिल (वय ८ वर्ष) आणि सुमन (वय ६ वर्ष) ही चार मुले एकटी होती. आरोपी महेंद्र बारेलाने विश्वास संपादन करून पावरा यांच्या घरी थांबला होता. त्यानंतर रात्री त्याने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. या कृत्याला विरोध केल्यामुळे आरोपीने इतर तीन अल्पवयीन भावंडांचाही कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करीत पळ काढला होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा