• Sun. Jun 7th, 2026
    Nashik MLC Election: महाजन-सामंत यांच्यात का रे दुरावा? एकमेकांना भेटणे टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी शमविण्यासाठी नाशिकमध्ये आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकमेकांनाच भेटणे टाळल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    उदय सामंत यांनी गिते बंधू आणि महाजन यांच्या संबंधाचा वारंवार उल्लेख केल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. वेळ मिळाला नसल्याने सामंत यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले आहे. तर, राजकारणात समज-गैरसमज होत असतात. ते वेळेवर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत, असे वक्तव्य सामंत यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

    Nashik Gokul Gite : नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, शेवटच्या दिवशीही बंडखोर उमेदवाराची माघार नाही, कारण काय? कोण आहेत गोकुळ गीते?
    नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरच भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गितेंनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी दराडेंना पाठिंबा द्यावा, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून मनधरणी सुरू असून, गोकुळ गिते शुक्रवारी माघार घेवून दरांडेना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी सामंत गुरुवारी रात्रीपासूनच नाशिकमध्ये तळ ठोकून होते. तर, गिरीश महाजन देखील गुरुवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाले होते. दोन्ही नेते एकत्र येऊन गिते बंधूंची समजूत घालतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सामंत आणि महाजन यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सूत्रे हलवत गोकुळे गिते, प्रसाद हिरे यांच्याशी संपर्क साधून माघारीसाठी प्रयत्न केले.

    जळगावमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजप उमेदवारासमोर बंडखोरी झाली असून, नाशिकमध्येही शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या निकटवर्तीयांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असून, त्यातून दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी भेटीगाठी टाळल्याचे बोलले जात आहे.

    Maharashtra TimesKirit Somaiya: विशेष लेखापरीक्षण करा! किरीट सोमय्यांची मागणी; हजारो जन्मदाखल्यांत फेरफार झाल्याचा आरोप
    गोकुळ गिते विषय लवकर संपेल : महाजन
    नाशिकमधील उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ गिते यांच्याशी बोलणे झाले असून, ते सध्या नाशिकबाहेर आहेत. ते परत आले की चर्चा होऊन हा प्रश्न मार्गी लागेल आणि या विषयावर लवकरच पडदा पडेल. आज-उद्यामध्ये हा विषय पूर्णपणे संपून जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. ‘बाप काढण्याच्या’ वादग्रस्त मुद्द्यावर मात्र, ‘गोकुळ गितेंना भेटल्यावरच याबाबत विचारणा केली जाईल,’ असेही महाजन म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed