Pune Water Shortage: पुणे शहरातील बुहतांश भागांमध्ये मुठा नदीवरील चार मुख्य धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या धरणांमधील पाणीसाठी झपाट्याने घटत असल्यामुळे महापालिकेने पाणीकपातीचा विचार सुरू केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब, यंदाच्या पावसावर असलेले ‘एल निनो’चे सावट आणि धरणांतील झपाट्याने घटणारा जलसाठा यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमधील एकत्रित पाणीसाठा गुरुवारी अवघ्या ५.५ अब्ज घनफुटांपर्यंत (टीएमसी) घटला असून, तो एकूण साठवण क्षमतेच्या २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेका शहरात ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ अथवा पाणीवापरावर निर्बंध लागू करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करीत आहे.
हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) २९ मे रोजी जाहीर केलेल्या सुधारित दीर्घकालीन अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीच्या संभाव्य निर्णयासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
Weather Alert: मान्सूनची आगेकूच सुरूच, गोव्याहून लवकरच कोकणात दाखल होणार; येत्या 48 तासांसाठी मराठवाडा, विदर्भात अलर्ट
पिंपरी-चिंचवडमध्ये १५ टक्के पाणीकपात
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी काटकसरीचा उपाय म्हणून महापालिका हद्दीमध्ये ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. प्रशासन सध्या विविध पर्यायांचा अभ्यास करीत असून, अंतिम निर्णयापूर्वी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना पुढील काही दिवस १५ टक्के पाणीकपात करण्याची नोटीसही बजावली आहे.
मान्सून आणखी लांबल्यास किंवा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी महापालिका आत्तापासूनच पाणीकपातीचे नियोजन करीत असली, तरी परिस्थिती गंभीर झाल्यास पुणेकरांना यंदा पावसाळ्यातही पाणीकपातीला तोंड द्यावे लागू शकते.
Thane Water Cut: ‘एल निनो’मुळे पाणीकपातीचं संकट! ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद; मुंब्रा, दिवा, मानपाडामध्ये परिणाम
पालिकेच्या प्रस्तावित उपाययोजना
पाणीकपातीची वेळ आल्यास त्याची तयारी करण्यासाठी अधीक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांनी आवश्यक आराखडा तयार करावा
या अभियंत्यांनी विभागनिहाय पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे
एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू झाल्यास कोणत्या भागाला, कोणत्या दिवशी पाणी द्यायचे याचा सविस्तर आराखडा तयार करून मुख्य कार्यालयाकडे सादर करावा
बुधवारी पुणे महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली होती. या पाणीकपातीमुळे पुण्यातील नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत यावर अंतिम निर्णय घेऊन पाण्यासाठी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा