Pune Crime : गर्भलिंग निदानासाठी ‘मोबाइल ॲप’चा वापर, पोर्टेबल सोनोग्राफी मशिनला WiFi ने जोडणी, पुण्यातील प्रकार
गर्भलिंग निदान करणाऱ्यांसाठी आता पोर्टेबल सोनोग्राफी मशिन बरोबरच ‘मोबाइल ॲप’चा वापर करण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. मार्च महिन्यात शिरूर तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला होता. आता यवत येथील कारवाईतही पोर्टेबल सोनोग्राफी मशिन आणि मोबाइल ॲपचा वापर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर, खासगी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गर्भपात केंद्रांची (एमटीपी सेंटर) तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली असून, तपासणीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचा आदेश दिला आहे.
