Monsoon Update : बहुप्रतीक्षित मान्सून केरळमध्ये दाखल, आगमन तीन दिवसांनी लांबलं, ‘एल निनो’चा काय परिणाम?
बहुप्रतीक्षित नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे, असे हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. साधारणपणे मोसमी पाऊस एक जूनच्या सुमारास केरळमध्ये येतो. यंदा त्याचे आगमन तीन दिवसांनी लांबले आहे. ‘मोसमी पाऊस गुरुवारी अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य व आग्नेय भागांत, पश्चिम-मध्य व पूर्व-मध्य समुद्राच्या काही भागांत, संपूर्ण लक्षद्वीप बेटांवर, केरळ व माहेमध्ये, कर्नाटक व तमिळनाडूच्या काही भागांत, कोमोरिन क्षेत्राच्या उर्वरित भागांत, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत पुढे सरकला आहे,’ असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
