म. टा. प्रतिनिधी, मुंबई : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी निवडणुकीतून माघार घेतली. अग्रवाल यांच्या माघारीने भाजपचे उमेदवार अरुण लखानी बिनविरोध निवडून आले आहेत. यवतमाळमध्ये काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी बुधवारीच माघार घेतली होती. अन्य अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यन्त चतुर्वेदी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. विधान परिषदेच्या 17 पैकी सहा मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार रिंगणात असल्याने तेथील निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवार असा सामना होईल. महायुतीला अनेक मतदारसंघांतील बंडखोरी शमवण्यात यश आले आहे.
करण ससाणे रिंगणाबाहेर
विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघातील अपक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारीबाबत रात्री उशिरापर्यंत संभ्रम होता. पानसरे यांच्या प्रतिनिधीने उमेदवारी माघारीचे पत्र दिले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी मनधरणी केल्यानंतर पानसरे यांनी माघार घेतली. त्यामुळे प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवीण पाटील-चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
‘मविआ’मध्ये माघारसत्र! अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महायुती सहा जागांवर बिनविरोध
विधान परिषदेच्या लढती पुढीलप्रमाणे
नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस-शप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (शिवसेना उबाठा) विरुद्ध रेश्मा काळे (शिवसेना बंडखोर)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शप) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
नांदेड – अमर राजुरकर (भाजप) विरुद्ध कृष्णा पाटील आष्टीकर (शिवसेना उबाठा) विरुद्ध प्रशांत इंगोले (अपक्ष)
Vidhan Parishad Election: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर्स’; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट भंडारा-गोंदिया – नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राम्हणकर (भाजप)
अमरावती – हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित)
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (शिवसेना उबाठा पक्ष) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (शिवसेना उबाठा)
नागपूर (पोटनिवडणूक) – डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा