Chipi Airport To Goa Water Travel: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेली एक फेरी एप्रिल महिन्यातच तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्यानंतर आता आणखी एका जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चिपी विमानतळाजवळ जेट्टीमार्गे गोव्यापर्यंत वाहतूक सुरू करण्याची योजना आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, मुंबई: कोकण ते मुंबई ही बोट सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळाला चालना मिळावी आणि हे विमानतळ थेट गोव्याशी जोडले जावं यासाठी नव्या जेट्टीमार्गाचा जलवाहतुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट गोवा अशी जलवाहतूक सुरू होण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. जिल्ह्यातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
कुठे असेल प्रस्तावित सेवा?
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जेट्टीपासून थेट गोव्यातील जेट्टीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव या बैठकीत सादर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं मानलं जात आहे. मंत्रालयात मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर करण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
Pune-Bengaluru Highway: तीन भुयारी ‘अंडरपास’मुळे प्रवास सुपरफास्ट, पुणे-बंगळुरू महामार्गावर मंजुरी; पुनावळे, वाकड परिसरात फायदा
या बैठकीत ‘कॉन्टिनेंटल इंटरलिंक प्राइव्हेट लिमिटेड’ आणि ‘गोवा (जोइझ) कार रेंटल’ या कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. चिपी ते गोवा जलवाहतूक प्रकल्प साकार झाल्यास सिंधुदुर्ग आणि गोवा या दोन प्रमुख पर्यटनस्थळांमधील संपर्क अधिक वेगवान आणि सुलभ होईल. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांचा वेळ वाचेल व अर्थव्यवस्थेलाही मोठा लाभ होणार आहे. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कुलदीप सिंग मुख्य संचालक चिपी विमानतळ, ‘कॉन्टिनेंटल इंटरलिंक प्राइव्हेट लिमिटेड’ चे विकास राजपूत व सतीश येरूंका तसेच ‘गोवा (जोइझ) कार रेंटल’ चे नाथन वेगास उपस्थित होते.
Mumbai Monorail: नव्या स्वदेशी बनावटीच्या रेक्स, पूर्वीपेक्षा अत्याधुनिक आणि वेगवान प्रवास; मोनोरेलवर अखेर सुरक्षिततेची मोहोर
मुंबई-विजयदुर्ग सेवा ठप्प
दरम्यान, मार्च महिन्या मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सुरू करण्यात आली होती. भाऊचा धक्का येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गदरम्यान चालवली जाणारी ही रो-रो सेवा एका महिन्यातच बंद करण्यात आली. जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. सेवा सुरू झाल्यावरही महागड्या दरांमुळे नागरिकांनी याकडे पाठ फिरवली होती. अशी परिस्थिती असताच आणखी एका जलवाहतुकीच्या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. त्यामुळे हा पर्याय किती पट यशस्वी होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा