Wardha Goras Bhandar FDA Action: गोरस भंडार येथे पाच हजार लिटर दूध सकाळी आणि पाच हजार लिटर दूध सायंकाळी संकलन केले जायचे. रविवारपासून गोपालकाचे दूध घरीच असल्याने दूध विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था , गोरस भंडार ही दूध संकलन व वितरण करणारी एक सहकारी तत्त्वावरील गांधींवादी संस्था आहे. शहरातील मगनवाडी परिसरात १९३१ पासून ही संस्था कार्यरत आहे. १० ऑक्टोबर १९६१ मध्ये गो संवर्धन गोरस भंडार या संस्थेची नोंदणी झाली. हजारो शेतकरी आणि गोपालक या संस्थेशी जोडले गेले. गोपालकांसाठी ही संस्था उपजीविकेचे साधन बनली. ज्यांची उपजीविका या गोरस भंडारच्या कामकाजावर अवलंबून आहे त्यांना ही संस्था आधार देत आली आहे.
Pune Crime: धर्मांतरास नकार दिल्याने महिला कर्मचारी बडतर्फ; हिंजवडीतील बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकार
आजघडीला ८५ गोपालक विविध गावांतून गोरस भंडारमध्ये दूध पुरवितात. तर २५० वितरक हे घरोघरी दूध वितरणाचे काम करतात. ज्यामुळे वर्धा शहरात अनेक घरात दूध पोहचण्यास मदत होत आहे. गोरस भंडार आणि त्यांच्या विविध ८ केंद्रात शेकडो कर्मचारी काम करीत आहे. या संस्थेचा गोरस पाक हा पदार्थ प्रसिद्ध आहे. एफडीएच्या कारवाईने थेट त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. दूध विकायचे कुठे आणि घरी ठेवायचे कसे? असा पेच आहे. तर काही गोपालकांनी येथे आणलेले दूध संतापून रस्त्यावर फेकले आहे. काही गोपालकांनी पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन व्यथा मांडली.
वर्धा जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर चालणारी सेवाग्राम येथील शासकीय दूध डेअरी बंद पडली आहे. त्या पाठोपाठ पिंपळखुटा येथील मोठा सहकारी तत्त्वावर चालणारा दूध प्रकल्पदेखील बंद पडला. आता एफडीएच्या कारवाईने गोपालक, दूध वितरक आणि कर्मचाऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या संकटातून बाहेर काढण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे.
Pune IT Scam: ‘असा’ घोटाळा कधी ऐकीवात नसेल, पुण्यातली IT कंपनीच निघाली फ्रॉड; 700 तरुणांची स्वप्नं उद्ध्वस्त, CEOला अटक
गेल्या अनेक वर्षांपासून गोरस भंडारा ही संस्था वर्धा शहरात दूध पोहचवते. अनेकांना रोजगार मिळाला तर वर्धेकरांना चांगले दूध मिळाले आहे. एफडीएच्या कारवाईमुळे पुढील आदेशापर्यत उत्पादन विक्री करू नये असे आदेश दिले गेले आहे. त्यामुळे गोपालकांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. – निलेश पाटील, अध्यक्ष, गोरस भंडार
गोरस भंडार या संस्थेशी जवळपास ६०० पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी कुटुंबीय जोडले आहे. ही संस्था कोणतीही प्रक्रिया न करता दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविते. या माध्यमातून दररोज सुमारे ९ हजार लिटर दूध वर्धा शहरातील सुमारे ५ हजार ग्राहकांपर्यंत घरपोच पोहोचविले जाते. दूध हा जीवनावश्यक पदार्थ असल्याने नियमांच्या अधीन राहून या संस्थेला दूध वितरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती पत्रातून जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे. -डॉ. अभ्युदय मेघे, वर्धा सोशल फोरम
गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवा! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी
खासगी डेअरीला दूध देण्याचा सल्ला
वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे मंत्री कन्हैया चांगानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गोपालकांचे हजारो लिटर दूध विक्रीची व्यवस्था कशी करावी असा पेच त्यांच्यापुढे मांडला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी एका खासगी दूध डेअरीला दूध संकलन करण्यासाठी सांगितले जाईल अथवा गोपालकांनी खासगी डेअरीमध्ये दूध द्यावे असे सांगितले. पण सर्वोदय मंडळाने याला विरोध केला. एखाद्या विशिष्ट खासगी डेअरीकडे दूध संकलन करण्यासाठी सल्ला देणे यात काही राजकीय डाव तर नाही ना अशी शंका चांगानी यांनी व्यक्त केली. त्यानंतर गोरस भंडार समोर दूध विक्री करण्याचे गोपालकांना सांगण्यात आले.
