• Tue. Jun 16th, 2026
    ‘धर्मांतर, लव्ह जिहाद; Nida Khan एकटी हे काम करु शकत नाही’, संजय शिरसाट यांचा मोठा दावा, थेट बड्या नेत्याचं नाव घेतलं

    मंत्री संजय शिरसाट यांनी आज निदा खान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एका बड्या नेत्याचं नाव घेत थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता एमआयएम पक्षाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खान प्रकरणी मोठा दावा केला आहे. “निदा खान प्रकरण हे एवढं छोटं नाहीय हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहे. कारण निदा खान एकटी हे काम करु शकत नाही. कुणाला पैसे पुरवणं, कुणाला आणखी काही वस्तू पुरवणं, त्यांचं धर्मांतरण करणं, त्यांचं लव्ह जिहादमध्ये रुपांतर करणं आणि काही दिवसांनी लग्न करुन आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम करणारं रॅकेट आहे. या रॅकटच्या मागे कोण कोण होतं ते पाहायला लागेल. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा निदा खान हिला सपोर्ट करायला माजी खासदार इम्तियाज जलील नाशिकला गेले. तिथून ते मुंब्र्याला गेले, तिला मुंब्र्याला नेलं, ती मुंब्र्याहून पुन्हा आमच्या संभाजीनगरला आली. जवळपास 30 ते 35 दिवस या ठिकाणी राहिली”, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला.

    “आरोपीला पाठिंबा देणं, आरोपीला लपवणं हा गुन्हा आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी कारवाई करत मतीन पटेल नावाच्या नगरसेवकाला अटक केली. त्याच्या स्टेटमेंटमध्ये सगळं आलं आहे. हा मतीन पटेल कोण? तर त्यांचा नगरसेवक. त्याने सगळं सांगितलं की, या प्रकरणात जे विचारायचं ते इम्तियाज जलील यांना विचारा. त्याने त्यांच्या सांगण्यावरुन केलेलं आहे. त्याच्या सांगण्यावरुन निदा खानला तिथे ठेवलं आहे. त्यांच्या सांगण्यावरुन निदा खान हिची देखभाल केलेली आहे. म्हणून इम्तियाज जलील हे त्या कटामधला एक सूत्रधार आहेत. असे अनेक सूत्रधार आहेत. म्हणून आता FIR मध्ये ज्याचं नाव येतं त्याला बोलवणं अपेक्षित आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. ते आता नाही म्हणाले तरी यामधील ते आरोपी आहेत हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे”, असा दावा संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना केला.

    मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय आश्वासन मिळालं?

    “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, शिरसाट या प्रकरणात कुणाची गय करणार नाही. त्या पद्धतीने तपास केलेला आहे. नाशिक पोलीस असतील, छत्रपती संभाजीनगर पोलीस असतील सर्व या प्रकरणाच्या मागे आहेत. हा प्रकार फक्त नाशिकपुरता मर्यादीत नाही तर याच्या जागा कुठे-कुठे आहेत, पाळंमुळं उखाडण्याचं काम नाशिक पोलीस यंत्रणा करत आहे. म्हणून मला असं वाटतं की, आता तपासाला चांगल्याप्रकारे गती आलेली आहे. अनेक आरोपी अटकेत राहतील”, असं संजय शिरसाट म्हणाले.

    ‘निदा खानच्या चार्जशीटमध्ये कुणाची नावे समोर येतील?’

    “पोलीस तपासात सर्व निष्पन्न होईल. तुम्ही फक्त मतीन पटेल याचं आरोपपत्र पाहिलं आहे. निदा खानचं आरोपपत्र अजून समोर आलेलं नाही. तिने सुद्धा इम्तियाज जलील यांचं नाव घेतलं असेल अशी मला शंका आहे. पोलीस सर्वच गोष्टी तुमच्यासमोर मांडणार नाहीत. आता चार्जशीट आल्यामुळे तुम्हाला ते कळालं आहे. पण निदा खान हिच्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये कोण कोण आहे ते जेव्हा समोर येईल त्यावेळेला मी बोललो होतो ते सत्य होतं हे तुम्हाला मानावं लागेल”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा