या प्रकरणी नाशिकमधील भोंदूबाबा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश शिवकुमार अधिकारी आणि गौरी कमलेश अधिकारी (रा. गोकुळधाम, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबत लोहगाव परिसरातील ५३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. डिसेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
HSRP साठी रजिस्टर केलं, पण नंबरप्लेट आली नाही, पुण्यात लाखो वाहन चालक ताटकळत, मुदत उलटल्यास दंड फिक्स
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पती आणि मुलासह शिवनगर परिसरात राहतात. काही काळापासून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याने त्यांच्या मुलाने यू-ट्यूबवर संबंधित माहिती शोधण्यास सुरुवात केली. त्या वेळी तंत्र-मंत्राद्वारे कमलेश अधिकारी विविध आजार बरे करीत असल्याचे दावे करणारे व्हिडिओ त्याला दिसले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला.
कमलेश अधिकारी याने तक्रारदारांच्या घरी भेट देऊन त्यांना भूतबाधा आणि करणीबाधा झाल्याचे सांगितले. हा प्रभाव दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून विविध धार्मिक साहित्य वापरून अघोरी विधी करण्यात आल्याचा आरोप आहे.
Farmer Loan Waiver: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 55 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36585 कोटींचे कर्जमाफ; योजनेच्या अटी व निकष काय?
पैसे खर्चुनही फरक नाही
या सर्व पूजांसाठी आणि कथित उपायांसाठी आरोपींनी ऑनलाइन व्यवहार; तसेच रोख स्वरूपात एकूण तीन लाख ९० हजार रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, एवढे पैसे खर्च करूनही कोणताही फरक पडला नसल्याने महिलेला संशय आला. त्यानंतर आरोपी दाम्पत्याने इतरांनाही अशाच प्रकारे फसवल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील करीत आहेत.
उज्जैन येथे स्मशानभूमीत पूजा
उज्जैन येथील स्मशानभूमीत मध्यरात्री विशेष पूजा करण्यास सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अघोरी विधी करण्यात आले. याच काळात आरोपी दाम्पत्याने स्वतःला शंकर आणि पार्वतीचा अवतार असल्याचे सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. पुढे तक्रारदार महिलेला कोलकाता, जेजुरी आणि नाशिक येथे नेऊन विविध धार्मिक विधी आणि पूजा केल्या
