Seasonal Fishing Ban Raigad: रायगडच्या किनाऱ्यांवरील मोठी घडामोड समोर आली आहे. पावसाळी कालावधी सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर आता खोल समुद्रातल्या मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. यावेळी समुद्र किनारी मच्छिमारी करणाऱ्या बोटींचा खच पाहायला मिळतो आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड: पावसाळा तोंडावर आहे. मान्सूनचे आगमन होणार आहे. त्याच कारणाने आता खोल समुद्रातल्या मासेमारीवर बंदी आणण्यात आली आहे. मासेमारी बंदीचा कालवळी हा १ जून रोजीपासूनच सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातल्या एकूण ६ हजार १२९ मच्छिमारांच्या बोटी रायगड समुद्रकिनारी विसावल्या आहेत. मच्छिमारी बंदीचा कालवाधी ३१ जुलैपर्यंत असणार आहे. पुढील मासेमारीचा कालावधी १ ऑगस्ट हा असणार आहे, म्हणजे मच्छिमार त्यांच्या बोटी पुन्ही खोल समुद्रात नेऊ शकतील. मासेमारी सुरु करतील.
रायगड जिल्ह्यातल्या ४ हजर २९३ मोटारवर चालणाऱ्या आणि यांत्रिक बोटी, याशिवाय १८३६ बिगर-मोटारचलित बोटीदेखील समुद्रात जाणार नाहीत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. यासगळ्याचा परिणाम निश्चितच मासेमारीच्या व्यवसायावर होईल आणि व्यवहार मंदावतील.
सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय
प्रत्येक वर्षी मान्सूनच्या आगमनाआधीच मासेमारी बंदी लागू केली जाते. समुद्रात या काळात वादळी वारे, उंच लाटा आणि धोकादाय हवामान निर्माण होत असते. त्याचा परिणाम मच्छिमारांच्या सुरक्षेवरही होऊ शकतो, त्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला गेला आहे.
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, उरण आणि पनवेल परिसरातली गावे मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसायावर चालतात. हजारो कुटुंबांचे आर्थिक गणितं याच व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातले हे मच्छिमार हे बंदीच्या काळात पर्यायी कामांकडे आपला मोर्चा वळवताना पाहायला मिळतात.
Monsoon News: पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ अन् उष्णतेची लाट! अल निनोचा प्रभाव वाढवणार जगाचं टेन्शन, हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी
या मासळींची मागणी वाढते
काहीजण या काळात बोटींची दुरुस्तीची कामे, जाळ्यांची निगा, रंगगंरोटी अशा स्वरुपाची कामेही करतात. मासेमारी बंदी असल्यामुळे बाजारामध्यही चित्र बदलते. ताज्या मासळीची आवक कमी होते. त्यामुळे मासळीचे दर वाढण्याची शक्यताही निर्माण होते. बंदी काळात कोळंबी, सुरमई, बांगडास पापलेट यांसारख्या मासळींची मागणी प्रचंड वाढते.
नियम तोडल्यास कारवाई
या काळात ग्राहकांना इतर जिल्ह्यातल्या मासळीवर भागवावे लागते, तसेच गोठवलेली मासोळ्यांची विक्रीही या कालावधीत होते. दरम्यान, मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना बंदी काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे. या काळात नियम तोडणाऱ्या बोटींवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. समुद्रकिनारी गस्त वाढवली जाणार आहे. संबंधित भागात विभागांमार्फत वेळोवेळी पाहणी केली जाणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा