• Sat. Jun 6th, 2026
    सूचकाच्या सहीवरून सोलापुरात रणकंदन, भाजप – काँग्रेस आमनेसामने

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडली.सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीची जागा काँग्रेस पक्षाला सुटली. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः याबाबत घोषणा केली होती. काँग्रेस कडून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी मिळाली होती. आदित्य फत्तेपूरकर यांनी सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननी करताना, काँग्रेस उमेदवाराचे सूचक नागेश भोसले यांनी आक्षेप घेतले, आणि माझी सही नाही, खोटी सही आहे,असे सांगत जिल्हाधिकारी यांना लेखी दिले. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या सूचकाने माघारी घेतल्याने भाजप उमेदवारा समोरील तगडे आवाहन संपुष्टात आले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत , भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, आणि देवेंद्र कोठे हे बाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed