• Sun. Jun 14th, 2026

    ‘एल निनो’मुळे पाणीकपातीचं संकट! ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद; मुंब्रा, दिवा, मानपाडामध्ये परिणाम

    ‘एल निनो’मुळे पाणीकपातीचं संकट! ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद; मुंब्रा, दिवा, मानपाडामध्ये परिणाम

    El Nino Impact: ठाण्यातील अनेक भागांमध्ये एल निनोच्या संकटामुळे पाणीकपात करण्यात येणार आहे. यामुळे गुरूवारी, 4 जून रोजी, जिल्ह्यातील अनेक प्रभागांमध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे: हवामान विभागाने यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरीच्या 90 टक्केच पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या 11 वर्षांतील सर्वात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील काही भागांत 4 जून ते 5 जूनदरम्यान, 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

    कोणत्या भागांमध्ये परिणाम?

    ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. एल निनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 14 मे रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयप्रमाणे आगामी पाणीटंचाईची परिस्थ‍िती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवार दिनांक 04 जून रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 05 जून रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

    Maharashtra TimesThane Water Cut: मान्सूनपूर्वी ठाणेकरांना फटका, 3 जून रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार; मुंब्रा, कळव्यासह अनेक भागांवर परिणाम

    सदर शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागांमध्ये परिणाम होणार आहे. शिवाय वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

    धरणांमधील पाणीसाठा कमी झाला

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आंध्रा व बारवी धरणातील टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत पाणी उपलब्ध राहील याकरिता पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. यामुळे शहरातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesDombivali Railway Station: डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होणार! स्थानक परिसराच्या विकासासाठी हालचाली; गर्दी, कोंडीतून कायमची सुटका

    दरम्यान, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही प्रशासनाने दिला आहे. तसेच सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन महापालिकेस सहकार्य करावे असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा