• Fri. Jun 5th, 2026

    Eknath Shinde: भाजपसोबत संघर्ष, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली? एकनाथ शिंदेंनी चित्र स्पष्ट केलं!

    Eknath Shinde: भाजपसोबत संघर्ष, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली? एकनाथ शिंदेंनी चित्र स्पष्ट केलं!

    Shivsena News: . ‘उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जूनपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून निर्णय घेतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील, ते माघार घेतील,’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

    shinde- thackeray(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    ठाणे: राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने काही जागांवरून महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपविरोधात जाहीर भूमिका मांडली. ‘शिवसेनेचे दोन भाग करायचे, एकाला हाताशी धरायचे आणि दुसऱ्यांवर अन्याय करायचा. दुसऱ्याला धरुन तिसऱ्यावर अन्याय करायचा, असे भारतीय जनता पक्षाचे काही नेते करीत आहेत. मोठा भाऊ आम्हाला संपवत आहे,’ असा आरोप अब्दुल सत्तार यांनी सोमवारी केला. त्यानंतर भाजपला आव्हान देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आलं. मात्र या चर्चा फेटाळत आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असून बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत आहे आणि याच शिवसेनेला लोकांनी पसंत दिली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    विधानपरिषदेच्या ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य केलं. “बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची विचारधारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. “सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आम्ही महाराष्ट्रात दुसऱ्यांदा स्थापन केलं आहे. राज्यातील जनतेनेही नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेवर, धनुष्याबाण चिन्हावर आणि बाळासाहेब व आनंद दिघेसाहेब यांच्या विचारांवर आपला विश्वास दाखवत आम्हाला विजयी केलं आहे. शिवसेनेचा हा विजयरथ यापुढेही सुरू राहील,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

    सर्व उमेदवार विजयी होण्याचा विश्वास

    ‘महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील,’ असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल केला. शिंदे यांनी फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंदआश्रमात जाऊन बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांनाअभिवादन केले.

    अखेर तिढा सुटला

    विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारीबाबत तिढा कायम होता. अखेर अपेक्षेप्रमाणे महायुतीकडून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. फाटक यांनी गेल्या टर्ममध्ये या जागेवरून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांनाच संधी दिली. तसेच महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शप) असल्याने या जागेवर पक्षाने ठाणे महापालिकेचे गटनेते अभिजीत पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या जागेसाठी दोन ‘ठाणेदारां’मध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे माजी खासदार कपिल पाटील, भाजपचे आमदार माधवी नाईक व कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा