• Sat. Jun 6th, 2026
    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा करुण अंत; खंडाळा घाटातील घटना, तिघे गंभीर जखमी

    म. टा. प्रतिनिधी, लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील फूड मॉलजवळ तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. अपघातामुळे द्रुतगती मार्गासह कनेक्टिंग लिंक मार्गावरील वाहतूक एक ते दीड तास विस्कळित झाली होती.

    अरविंद कुमार रंगाराव अल्लू (वय ५०), शिवा अप्पाराव भुक्का (वय ३५, दोघेही रा. येल्लूर, आंध्र प्रदेश) असे मृत ट्रकचालक व क्लीनरची नावे आहेत. इर्टिगा कारचालक सौरभ मुकिंदा सस्ते (वय २६), लीलाबाई किसन सस्ते (वय ७६) व महेंद्रकुमार पॉल (वय ३९, तिघेही रा. खारघर, रायगड) हे जखमी झाले आहेत.

    Pune MLC Election: राष्ट्रवादीत हाय-व्होल्टेज ड्रामा! विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंना ‘कात्रजचा घाट’; अनेक नेते नाराज
    खोपोली महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे तांदूळ व खाद्यतेलासह इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे (एपी ३९ टीझेड १३४९) खंडाळा घाटातील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जात असलेल्या कंटेनरवर (जी जे २३ ए डब्ल्यू ४४२३) मागून जोरात धडकला. या धडकेत दोन्ही वाहने महामार्गावरच उलटली. याच दरम्यान मागून वेगात येणाऱ्या इर्टिगा कारचालकाला (एमएच ३१ जीए ५२०३) अपघातग्रस्त वाहनांचा अंदाज न आल्यामुळे इर्टिगा कार अपघातग्रस्त वाहनांवर आदळली. यात ट्रकचालकासह क्लीनरचा जागीच मृत्यू झाला, तर इर्टिगा कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक विनोद मालवे, बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस उपनिरीक्षक सरोदे, प्रभाकर मोहिते, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, फौजदार अमोल धायगुडे, कौशिक फेंगडू यांच्यासह देवदूत आपत्कालीन पथक आणि डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

    Maharashtra TimesPune ST Bus: स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने 23 वर्षीय तरुणीचा मणका फ्रॅक्चर; संवेदनाही हरपली, बसचालकावर गुन्हा
    या अपघातामुळे ट्रकमधील तांदळाच्या गोण्या, खाद्यतेलाचे डबे, बॉक्स व इतर साहित्य मार्गावर विखुरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चारही मार्गिका बंद झाल्या होत्या. परिणामी, वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महामार्ग पोलिस आणि खोपोली पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह कनेक्टिंग लिंक मार्गावरील वाहतूक एक ते दीड तास रोखल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

    पोलिसांनी ‘डेल्टा फोर्स’ व ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मार्गावर विखुरलेले साहित्य हटविले. त्यानंतर तिन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed