MSRTC E-Buses: पर्यावरणपूरक प्रवासासाठी एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हळूहळू एसटीचा पूर्ण ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित केला जाणार आहे. सर्वात पहिल्या टप्प्यात 2029पर्यंत 50 टक्के ई-बसेस दाखल होतील.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेससंदर्भात बैठक झाली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपसचिव चेतन निकम आदी या बैठकीस उपस्थित होते.
Pune ST Bus: स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने 23 वर्षीय तरुणीचा मणका फ्रॅक्चर; संवेदनाही हरपली, बसचालकावर गुन्हा
७ दिवसांत निरीक्षण होणार
पर्यावरणपुरक ई-बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत, त्या मार्गाचा कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादाराकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील ७ दिवसांत निरीक्षण करावे. या बसेसकरिता एक परिसंस्था तयार करावी. ज्या मार्गाने खासगी बसेस धावतात, त्या मार्गाचाही अभ्यास करून ई-बसेसचा पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश मुख्यंत्र्यांनी दिले. राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार १५०० ई-बसेसना बसच्या किंमतीच्या १० टक्के किंवा कमाल २० लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यावरणपुरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे धोरण महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर ५,१५० ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एसटी आगारांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त महामंडळात यांत्रिक पद्धतीच्या सफाईचा श्रीगणेशा होणार आहे. यासाठी नव्याने यंत्रणा विकत घेण्यात आली आहे. या यंत्रणेच्या मदतीने मुंबई सेंट्रलसारख्या आगारातील फलाट स्वच्छता अर्ध्या तासाऐवजी आठ ते दहा मिनिटांत पूर्ण होणार आहे. एसटी महामंडळाचा ७८वा वर्धापन दिन प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे सोमवारी पार पडला. यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत ‘अ’ वर्गात बारामती, ‘ब’ वर्गात तिरोडा आणि ‘क’ वर्गात अकोले बसस्थानक प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष
सुवर्णपदक योजनेतंर्गत १२ आणि लालपरी गौरवरत्न पुरस्काराने ६ कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.
Bhiwandi ST Depot: पाच दशकांहून जुन्या भिवंडी एसटी स्थानकाची अखेर पुनर्बांधणी; इमारत, फलाटांचा विकास, हजारो प्रवाशांना फायदा
सामान्यपणे आठ ते दहा एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जाते. यासाठी साधारण ३० ते ३५ मिनिटे लागतात. मानवी पद्धतीने स्वच्छता होत असल्याने दिवसातून ती दोनच वेळा केली जाते. त्यामुळे अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारी कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने दर चार तासांनी सफाई होणार आहे. आगारांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आता ‘क्रिस्टल’ आणि ‘स्मार्ट सर्व्हिस’ यांच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत ही यंत्रसामग्री सर्व बसस्थानकांमध्ये पोहोचेल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
