Mumbai Metro 9: एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या दहिसर ते मिरा भाईंदर मेट्रोला उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवास अधिक सोपा करण्यासाठी वाहतूक कोंडीच्या मार्गावर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदरम्यान मेट्रो ९ मार्गावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी एमएमआरडीएने सात नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मिरा-भाईंदर रोडवरील वाहतूक लक्षात घेता पादचाऱ्यांसाठी हे पूल महत्त्वाचे ठरणार आहेत. राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सुमारे ११ किमी लांबीच्या मेट्रो ९ वरील आठ स्थानकांवरील पूल एमएमआरडीएच्या ‘मल्टि-मोडल इंटिग्रेशन’ (एमएमआय) उपक्रमाचा भाग आहेत. मेट्रो २अ आणि ७ मार्गांवर राबविण्यात आलेल्या एमएमआय उपक्रमाच्या धर्तीवर हे पूल विकसित केले जाणार आहेत. या कामासाठी ८२.०९ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.
ST Bus: १०० टक्के एसटी बसेस ‘इलेक्ट्रिक’ करणार, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवास आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार
कोणत्या सुविधा उपलब्ध होणार?
सर्व पुलांची रुंदी तीन मीटर असेल. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी पुलाला सरकते जिने, लिफ्ट अशा सुविधा असणारआहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पुलांमुळे रस्ते सुरक्षितपणे ओलांडणे शक्य होईल, तसेच गर्दीच्या वेळी प्रवाशांचे व्यवस्थापन सुलभ होण्यास मदत होणार आहे. मेट्रो ९ मार्गावरील पहिला टप्पा ७ एप्रिलला सुरू झाला आहे. उर्वरित अंतिम टप्प्यातील कामे सध्या सुरू आहेत. पूर्ण मार्ग सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना आवश्यक पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. या कामासाठी ‘स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर जेव्ही’ आणि ‘पीआरएस इन्फ्राप्रोजेक्ट्स एलएलपी’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी समुारे 50 किलोमीटर लांब मेट्रो मार्गांमध्ये भर पडत आहे. त्यामुळे मेट्रोवरील प्रवास सोपा करण्यासाठी इतर पायाभूत सुविधा विकसित करणंही महत्त्वाचं आहे.
‘आधुनिक शहरी वाहतूक व्यवस्थेत ‘मल्टि-मोडल इंटिग्रेशन’ हा महत्त्वाचा घटक आहे. प्रस्तावित नवे पादचारी पूल नागरिकांच्या सुरक्षित हालचाली आणि स्थानकांपर्यंत पोहोचणे सुलभ करणार आहेत. प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल’, असे एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
Bandra News: वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर कोंडीमुक्त प्रवास, गरीबनगरमधील कारवाईनंतर रिक्षा-बसचं नियोजन, उन्नत मार्गासाठी प्रस्ताव
कुठे-कुठे बांधणार पूल?
पश्चिम द्रुतगती महामार्ग
दहिसर टोलनाका – १४५ मीटर
मिरागाव ८७ मीटर
मिरा-भाईंदर रोड
काशीगाव ९२ मीटर
शिवार गार्डन ८० मीटर
मॅक्सस मॉल ८३ मीटर
वेज सागर हॉटेल ८८ मीटर
साईबाबानगर – ८० मीटर
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा