CSMT Goregaon Harbour Local Extend to Borivli : गोरेगाव–बोरिवली हार्बर मार्ग विस्तारामुळे पश्चिम उपनगरांतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सध्या हार्बर मार्ग गोरेगावपर्यंत मर्यादित असल्याने बोरिवली, मालाड आणि कांदिवली परिसरातील प्रवाशांना लाभ मिळत नाही
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी निविदा मागवल्या आहेत. एमयूटीपी ३ए अंतर्गत हार्बर विस्तार प्रकल्प राबवण्यात येत आहे.
बोरीवलीच्या प्रवाशांना दिलासा
गोरेगाव–बोरिवली हार्बर मार्ग विस्तारामुळे पश्चिम उपनगरांतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या हार्बर मार्ग गोरेगावपर्यंत मर्यादित असल्याने बोरिवली, मालाड आणि कांदिवली परिसरातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळत नाही. बोरिवलीपर्यंतचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. बोरिवली परिसरातून सीएसएमटी, कुर्ला, पनवेल आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट लोकल मिळणार आहे. जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगाव येथील प्रवाशांना मात्र गर्दीचा सामना करावा लागणार आहे. Georgia Crash : लग्नानंतर नवदाम्पत्य निघालं, पायलटचा अट्टाहास जीवावार, हेलिकॉप्टर कोसळून नवरदेवाचा अंत, वधूच्या समोरच प्राण सोडले मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी)-३ए अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गोरेगाव–बोरिवली हार्बर मार्ग विस्तार प्रकल्पाची एकूण किंमत ८९८.२९ कोटी रुपये आहे. सद्यस्थितीत नागरी अभियांत्रिकी कामांसाठी ७२७.६४ कोटी, विद्युत कामांसाठी ८८.३३ कोटी तर सिग्नलिंग व दूरसंचार कामांसाठी ८२.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तारणहार एकटे फडणवीस, एकनाथ शिंदे बदलले? मनोज जरांगेंची खदखद
पुलांच्या आराखड्यांची तयारी सुरू
या मार्गावर दोन मोठे आणि १६ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी चार अभियांत्रिकी आराखडे तयार करण्यात आले असून ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. बहुतांश पुलांना आवश्यक मंजुरी मिळाली असून उर्वरित पुलांच्या आराखड्यांची तयारी सुरू आहे.
पुनर्वसनासाठी घरे
प्रकल्पासाठी एकूण ३,६८७.७ चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी तीन हजार ३८९ चौ. मीटर खासगी जमीन असून २९८.७ चौ. मीटर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यातील आहे. रेल्वेच्या जागेवरील ५२० प्रकल्पग्रस्तांची निश्चिती झाली असून १७८ जणांना पुनर्वसनासाठी घरे देण्यात आली आहेत. Saket Building Collapse : बाबा, परीक्षेनंतर या; शेवटचं वचन अधुरं राहिलं, बर्थडेच्या तोंडावर लेकीचा अलविदा, ढिगाऱ्याजवळ पिता निर्विकार चेहऱ्याने बसून प्रकल्पातील ५६.८४ कोटी रुपयांच्या स्थानक व सेवा इमारतींच्या बांधकामाचे कंत्राट नियुक्त करून काम सुरू आहे. ६९.९८ कोटी रुपयांच्या पादचारी पूल, डेक आणि स्कायवॉक उभारणीचे कामेही विविध टप्प्यांत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा