• Sun. Jun 7th, 2026
    Nashik MLC Election 2026: नाशिकमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाचाच अपक्ष अर्ज; महायुतीची डोकेदुखी वाढणार?

    Nashik MLC Election 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बिनविरोध निवडणुकीला विरोध दर्शवला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अजयेश साबळे, नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आता समोर आला आहे. भाजपाचे गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी आज अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला आहे.” मला फक्त समोर शिंदे गट दिसत आहे, बिनविरोध झालेली निवडणूक ही घातक असते”, असे उदाहरण देत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे जाहीर केले आहे.

    नाशकात ट्विस्टवर ट्विस्ट

    एकंदरीतच पाहता महायुतीकडून नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आज मंत्री दादा भुसे आणि महायुतीतील मित्र पक्षातील आमदार पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी दाखल केला आहे. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तसेच भाजपचे नेते गणेश गीते यांनी देखील आपला भाजपकडून उमेदवारी अर्ज आणि एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, असे असतानाच आज शेवटच्या अर्ध्यातासाआधी गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज हा दाखलं केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये एक वेगळा ट्विस्ट यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

    “बिनविरोध होऊ नये म्हणून…”

    गोकुळ गीते यांनी त्यांची भूमिका मांडत आपल्याला या निवडणुकीत समोर केवळ शिवसेना (शिंदे) हेच दिसत असून बिनविरोध निवडणूक होने हे घातक आहे, म्हणून मी आपला उमेदवारी अर्ज भरला असल्याचे गोकुळ गीते यांनी म्हटले आहे. आजपर्यंत नाशिक ह्या मतदार संघाचा जर इतिहास पाहिला तर ज्यांच्याकडे बहुमत नाही तोच उमेदवार आजपर्यंत या निवडणुकीत जिंकून आला आहे. मला या मतदारसंघाची रणनीती माहिती असून मी या निवडणुकीत शेवटपर्यंत टिकेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी मांडत या निवडणुकीत आपली उमेदवारी कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Maharashtra TimesKalyan Ice Cream Worm: आईस्क्रीम खाताना मुलाला धक्काच बसला, आत सापडला 3 इंचांचा किडा; कल्याणमध्ये खळबळ

    विद्यमान आमदार हे लोकांच्या सुखा-दुःखात दिसले नाही. त्यांनी वयक्तिक विकास केला असे दिसत आहे, असे म्हणत गोकुळ गीते यांनी विद्यमान आमदार यांना टोला लगावला आहे. त्यामुळे मी सर्वांच्या भेटीगाठी घेणार असून त्यांना माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

    Screenshot 2026-06-01 193724
    अपक्ष उमेदवार गोकुळ गीते

    इस्लाम पार्टीनेही दिला उमेदवार

    गोकुळ गीते यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ही जागा मविआ मधील शिवसेनेकडे होती, मात्र ह्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजारामुळे ही जागा न लढविण्याचा निर्णय मविआने घेतला असल्याची माहिती उबाठाचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिली. मात्र आताचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे त्यावेळच्या शिवसेनेकडून लढले होते निवडूनही आले होते, ह्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळले. तर मालेगाव मधील केवळ 35 नगरसेवक असलेल्या इस्लाम पार्टीने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असे सांगत उमेदवार दिला आहे.

    येत्या काळात ही निवडणुकीच्या रिंगणात काय घडामोडी होताना दिसून येतात हे बघणे महत्वाचे असणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा