• Sun. Jun 7th, 2026
    Kalyan Ice Cream Worm: आईस्क्रीम खाताना मुलाला धक्काच बसला, आत सापडला 3 इंचांचा किडा; कल्याणमध्ये खळबळ

    Ice Cream Controversy Kalyan: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात एका लहान मुलाच्या कोन आईस्क्रीममध्ये तब्बल 3 इंचांचा किडा आढळल्याने खळबळ उडाली. संतप्त पालकांनी चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतमधील कोळसेवाडी परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका लहान मुलानं खरेदी केलेल्या एका कोन आईस्क्रीममध्ये तब्बल तीन इंच लांबीचा किडा आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व येथील, रचना पार्क येथील एका दुकानातून शशांक जाधव नावाच्या मुलाने कोन आईस्क्रीम खरेदी केलं होतं. आईस्क्रीम खाण्यास सुरुवात करताच त्यामध्ये किडा असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. हा प्रकार समोर येताच मुलाच्या कुटुंबियांनी संबंधित दुकान गाठून तीव्र संताप व्यक्त केला आणि याबाबत स्पष्टीकरण मागितलं. घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

    प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दुकानदारानं संबंधित कंपनीच्या वितरकाला (डिस्ट्रीब्युटर) देखील घटनास्थळी बोलावलं. दुकानदाराने आपली बाजू मांडताना सांगितलं की, ‘या प्रकरणात त्याची कोणतीही चूक नाही. संबंधित आईस्क्रीमची एक्सपायरी डेट 2027 पर्यंत वैध असून ते कंपनीकडून सीलबंद अवस्थेत प्राप्त झालं होतं’. घरच्यांनी ते आईस्क्रीम जवळून पाहिले असता त्यात तब्बल लांब आणि जाड किळसवाणा असा किडा चिकटलेला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे या आईस्क्रीमच्या पॅकेटवरील एक्सपायरी डेट ही 2027 पर्यंतची होती.

    पुढे काय झालं?

    मुलाच्या आईस्क्रीममध्ये हा प्रकार पाहून पालक प्रचंड घाबरले आणि त्यांनी तातडीने संबंधित दुकानदाराकडे धाव घेतली आणि त्याला जाब विचारला. त्यावर दुकानदाराने हात झटकला त्यानंतर कंपनीच्या वितरकाला बोलावलं मात्र, त्यानेही चूक मान्य करण्याऐवजी हात झटकून तेथून निघून गेला. दरम्यान, मुलाच्या कुटुंबियांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    Maharashtra TimesParbhani Hingoli MLC Election: परभणी-हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट सामना! ठाकरेसेनेपुढे शिंदेसेनेने दिला मुस्लिम उमेदवार

    पालकांमध्ये संताप

    आईस्क्रीमबाबत असा प्रकार घडणे हा फक्त निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या जीवाशी खेळणारा थेट गुन्हाच आहे, असा संताप मुलाच्या पालकांनी व्यक्त केलेला आहे. जर हा किडा नकळतपणे मुलाच्या पोटात गेला असता तर जीवाला धोकाही निर्माण झाला असता. मात्र, आता या आईस्क्रीम कंपनीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी ते करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा