विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली मतदासंघात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही युती आणि आघाडी दोन्ही ठिकाणी बंडखोरी होताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता कोण किती जागा मिळवून विजयी होतं, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल सात जणांनी आपली उमेदवारी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून विवेक नावंदर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याचवेळी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपुत्र सुशील कुमार देशमुख यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दुसरीकडे महायुतीमध्ये परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली. एकनाथ शिंदे यांनी साहिल खान यांना उमेदवारी दिली. सईद खान यांनी महायुतीच्या नेत्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या एका महापालिकेच्या सदस्याने देखील उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले.
परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आणि ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज विवेक नावंदर यांनी ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील, खासदार संजय जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्रानी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून विवेक नावंदर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमदार राहुल पाटील यांनी आमचाच विजय होणार असल्याचे ठामपणे सांगितले. स्पष्ट बहुमत आम्ही जमा करूनच उमेदवारी अर्ज भरले असल्याचे देखील ते म्हणाले.
महायुतीकडून परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटली. शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आजच ऐनवेळी सईद खान यांचे उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांसह त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार संतोष बांगर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, या निवडणुकीमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. महायुती राज्यातील 17 पैकी 17 जागा जिंकणार आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट लढत दिसत असताना देखील आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नावंदर यांच्या विरोधातच काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपुत्र सुशील देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. त्याचबरोबर महायुतीमध्ये देखील बंडखोरी झाल्याचे समोर आले.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सईद खान यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनपा सदस्य विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर भाजपचे मनपा सदस्य असलेले विश्वजीत बुधवंत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या शेवटपर्यंत किती जण आपला उमेदवारी अर्ज वापस घेतील, हे स्पष्ट होईल. पण सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा