• Wed. Jun 17th, 2026
    Shivrajyabhishek Sohala : रायगडाच्या महादरवाजाला पहिल्यांदाच पितळेचे भव्य तोरण; दिमाखदार असेल यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा

    यावर्षी शिवराज्यभिषेक सोहळा यावेळी कशा साजरा केला जाणार या विषयी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे माहिती दिली. यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळ्यात काही नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहिती ही शिवप्रेमींची उत्सुकता वाढवणारी आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक दिन (6 जून 1674) या वर्षी रायगडावर परंपरेपेक्षा व्यापक स्वरूपाने आणि राष्ट्रीय दर्जाच्या उत्सवात यंदा साजरा केला जाणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषद घेऊन याबाबत सर्व माहिती दिली. हा “शिवराज्याभिषेक सोहळा – भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन 6 जून लोकोत्सव” या संकल्पनेवर आधारित असून देश-विदेशातून हजारो ते लाखो शिवभक्तांच्या सहभागाची अपेक्षा समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

    40 समित्यांकडून व्यवस्थापन

    समितीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एकूण 40 विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. त्या वाहनतळ, प्रवेश-नियमन, अन्नछत्र, आरोग्यसेवा, प्राथमिक उपचार, मर्दानी खेळ, संचार व माहिती, भक्तमार्ग, साफसफाई, सुरक्षा व सामूहिक मार्गदर्शन यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळतील. महोत्सव समितीने अधिकृतपणे सांगितले की, सर्व समित्या 1 जूनपासून गडावर तैनात राहतील आणि 5–6 जून दरम्यान अहोरात्र सेवेची व्यवस्था असेल. प्रत्येक समितीला नेमलेल्या लीडरकडे प्रशिक्षण देण्यात आले असून संपर्क केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

    रायगडाच्या महादरवाजावर पितळेचे ऐतिहासिक तोरण

    महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर आणि कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देताना समितीने सांगितले की, “यंदा रायगडाच्या महादरवाजावर 12 फूट लांब आणि 2 फूट उंच पूर्ण पितळेचे ऐतिहासिक तोरण पहिल्यांदाच बसवले जाणार आहे. या तोरणावर गणपती, स्वस्तिक, मोर आणि पोपट यांसारखी पारंपारिक शुभचिन्हे कोरली आहेत. छत्रपतींच्या सुवर्ण होणाच्या प्रतिमा देखील विशेषरित्या कोरण्यात आल्या आहेत. या तोरणाच्या एक बाजूवर “श्री राजा शिव” आणि दुसऱ्या बाजूला “छत्रपती” असे लिहिण्यात आले असून 5 जून रोजी तोरण महादरवाज्यावर प्रतिष्ठापित केले जाईल, असे समितीने स्पष्ट केले.

    उत्तर भारतातील मराठे येणार

    शिवप्रेमींना सूचित करण्यात आले आहे की, गर्दीचे प्रतिबंध लक्षात घेता नियोजित वेळेपूर्वी पोहोचणे आणि अधिकृत मार्गदर्शकांचे नियमानुसार वागणे आवश्यक आहे. समितीच्या अंदाजानुसार यंदा उपस्थिती लाखोंपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कार्याध्यक्ष सुखदेव गिरी म्हणाले की, “उत्तर भारतातून ‘रोड मराठा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या संघटनांच्या तुकड्या पानिपत, दिल्ली आणि इतर भागातून येत आहेत. तसेच परराष्ट्रात स्थायिक असलेल्या महाराष्ट्रातील समाजाचे बांधव आणि जगभरातील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील,”.

    कार्यक्रमाचे वेळापत्रक (अधिकृत)

    5 जून (पहिला दिवस) : दुपारी 3:30 वाजता राजमाता जिजाऊंच्या समाधीस अभिवादन; 4:00 वाजता युवराज संभाजी छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपतींचे भव्य स्वागत; गड चढाई सुरू; होळीच्या माळावर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके; गडपूजन, भजन-कीर्तन व ढोल-ताशा प्रात्यक्षिक

    6 जून (मुख्य दिवस): सकाळी 7:00 वाजता नगारखान्यासमोरील ध्वजारोहण; राजसदरेवर शाही प्रवेश; मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे पूजन; सुवर्णनाण्याचा अभिषेक; नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर या मार्गाने छबिन्याची मिरवणूक

    नागरिकांना सूचना आणि आवाहन

    समितीने शिवभक्तांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचे, कचरा नियमन पाळण्याचे आणि राज्यस्तरीय आरोग्य व सुरक्षा निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच महत्त्वाचे कायदे आणि मार्गदर्शक सूचना स्थानिक प्रशासनाकडून सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांद्वारे जारी केल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर समितीने सर्व शिवभक्तांना या ऐतिहासिक लोकोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण देत म्हटले आहे की, “हा उत्सव परंपरा जतन करत देश-विदेशात छत्रपतींच्या आदर्शाचा प्रसार करेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा