Gadchiroli News: इन्स्टाग्रामवर दोन तरुणांमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर समलैंगिक प्रेमसंबंधांत झाले होते.
महाराष्ट्रातील तरुण ओडिशातील सूरजच्या प्रेमात पडला; दोघे भेटले, पण ती एक गोष्ट समजताच प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गडचिरोली: अलीकडील काळात सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून प्रेमाचे सूत जुळाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र सोशल मीडियावरून होणारी ही ओळख कधीकधी जीवावरही बेतते. अशीच एक धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. आधी सोशल मीडियावर झालेली ओळख आणि नंतर लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना एटापल्ली-जरावंडी मार्गावर रविवारी ३१ मे रोजी उघडकीस आली आहे. सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (वय ३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या हत्येप्रकरण सूरज हलदार याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसायिक म्हणून काम करणारा सतीशकुमार याची मूळचा ओडिशा येथील असणाऱ्या सूरज हलदारशी याच्यासोबत सोशल मीडियावर ओळख झाली. इन्स्टाग्रामवर झालेल्या या ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर समलैंगिक प्रेमात झाले. दोन्ही तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला तर मनोजकुमार आणि सूरज हे दोघेही आपल्या नात्यात आनंदी होते. मात्र त्यानंतर लग्नावरून दोघांमध्ये मतभेद झाले. हाच वाद विकोपाला गेला आणि रविवारी एटापल्ली-जरावंडी मार्गावर सूरज हलदार याने मनोजकुमार याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याचा गळा चिरला. या क्रूर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनोजकुमार याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर ओडिशा येथील रहिवासी असलेला सूरज हा नुकताच सतिशकुमारला भेटण्यासाठी गडचिरोलीतील नागेपल्ली इथं आला होता. यावेळी दोघे दोन दिवस एकत्र राहिले. या भेटीत सतीशकुमार विवाहित असल्याचं सूरजला कळालं. त्यानंतर सूरज रविवारी पहाटे पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. मात्र सतीशकुमार विवाहित असल्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर भयंकर हत्याकांडात झालं. सूरज हलदार याने चाकूने वार करून सतीशकुमारला ठार केलं.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा