Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेणार, पण कोर्टाच्या आदेशांचेही पालन करावे लागणार; जरांगेंच्या उपोषणावर बोलताना मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले?
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार कायम सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचे सांगितले. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत सर्वाधिक निर्णय हे त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतल्याचा दावा केला.
मनोज जरांगे पाटील हे सध्या भर उन्हात उपोषणाला बसले आहे. यावर नागपूर इथं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सरकारने या प्रश्नावर सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या हितासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या, तेव्हा सरकारने त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आणि सकारात्मक आहे. भविष्यातही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची सरकारची भूमिका कायम राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले .
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारे सरकार आहे. आम्ही कोणत्याही समाजाला एकमेकांपुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांचे चांगलंच होईल हा प्रयत्न करतो, मराठा समाजासाठी जेवढे निर्णय मी आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाही आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. मात्र कोणताही निर्णय घेताना देशाचे संविधान, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. या निर्णयाचा अवलंब न करता एखादा निर्णय घेतला तर त्यातून केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे जे निर्णय त्यांच्या कसोटीवर खरे ठरणारे निर्णय असतील ते सर्व निर्णय आम्ही घेऊ,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी समाजाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एका समाजाचे हक्क काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका सरकारची कधीच नव्हती आणि भविष्यातही राहणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सीएनजी, पेट्रोल आणि इंधन दरवाढीबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या संपूर्ण जग ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. इंधन तेलाच्या किमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्येही इंधनाचे दर वाढलेले आहेत. पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. मात्र हे जागतिक संकट कमी झाल्यानंतर इंधनाचे दर पुन्हा कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा