• Sun. Jun 7th, 2026

    Tukaram Mundhe: विषारी दारुमुळे पुण्यात मृत्यूंची मालिका; तुकाराम मुंढेंनी भेसळीची पाळेमुळे खणून काढली, भिवंडीत मोठी कारवाई!

    Tukaram Mundhe: विषारी दारुमुळे पुण्यात मृत्यूंची मालिका; तुकाराम मुंढेंनी भेसळीची पाळेमुळे खणून काढली, भिवंडीत मोठी कारवाई!

    पुणे: पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे मागील दोन दिवसांत तब्बल २२ जणांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर घटनेनं राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) या घटनेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत कारवाई करण्यात आली असून मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी विषारी दारू ज्या केमिकलच्या साहाय्याने बनवण्यात आली होती, त्या केमिकलचा मोठा साठा भिवंडीत असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ भिवंडीतील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यात प्रशासनाकडून जवळपास 5 हजार 929 किलोग्रॅम इतका इथेनॉलचा प्रचंड मोठा साठा जप्त केला गेला. पुण्यात जी विषारी दारू विकण्यात आली ती बनवण्यासाठीचे मुख्य रसायन याच कंपनीकडून पुरवण्यात आलं होतं, अशी माहिती आहे. त्यामुळे हा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.

    पुण्यात नेमकं काय घडलं?

    पुणे जिल्ह्यातील दापोडी परिसरातील एका हातभट्टी अड्ड्यावर मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी नागरिकांनी गावठी दारू प्यायली. ही दारू प्यायल्यानंतर संबंधित लोकांना डोळ्यांची जळजळ, चक्कर येणे, अंधारी येणे, श्वसनास त्रास, छातीत दुखणे व तोंडातून फेस येणे अशी लक्षणे जाणवू लागली. यामुळे काहींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु रुग्णालयात पोहोचण्याआधीच काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    तुकाराम मुंढेंच्या एंट्रीनंतर FDA च्या कारवाईला वेग

    तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भ्रामक; तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हाती घेतली आहे. याअंतर्गत आक्षेपार्ह जाहिराती असलेला ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा औषधसाठा राज्यभरातून जप्त करण्यात आला आहे; तसेच सात जिल्ह्यांतील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘एफडीए’च्या वतीने देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे मे. दिव्या फार्मसी यांच्या उत्पादनाच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून हरिद्वार (उत्तराखंड) येथे मे. दिव्या फार्मसीच्या औषधांचा सात लाख २६ हजार ७५५ रुपये, नाशिक येथे सात लाख १० हजार ९४५, पुणे येथे १४ लाख ६८ हजार ९८१, मुंबई येथे एक लाख ८५ हजार ६००, कोकण विभागात १८ लाख ५८ हजार, अमरावती येथे एक लाख ४२ हजार २२९, छत्रपती संभाजीनगर येथे ४८ हजार ७१८ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यात दोन ॲलोपॅथीसदृश औषधांचा २१ लाख ४२८ रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed