• Sat. Jun 6th, 2026
    Pune News : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कार्यालयात खेटा मारणं बंद, अवघ्या 14 दिवसांत जमिनीची मोजणी, कधीपासून अंमलबजावणी होणार?

    Pune News : राज्यात गेल्या एक जूनपासून १०५ तालुक्यांमध्ये १४ दिवसांत द्रुतगती; तर २८ दिवसांत नियमित मोजणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यात १४ दिवसांत द्रुतगती मोजणी करणे शक्य होणार आहे.

    शेतजमीन मोजणी नियम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुस्तफा आतार, पुणे : भूमी अभिलेख विभागाने पोटहिस्सा मोजणीचा क्रांतिकारी निर्णय घेतल्यानंतर आता कमी दिवसांत मोजणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रलंबित मोजण्यांची संख्या कमी करण्यासाठी; तसेच तातडीने जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या मोजणीचा कालावधी कमी करून देण्यासाठी ‘द्रुतगती’ मोजणी आता केवळ १४; तर नियमित मोजणी २८ दिवसांत करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. राज्यातील १०५ तालुक्यांमध्ये या मोहिमेची एक जूनपासून अंमलबजावणी होणार आहे.

    १२०० रोव्हर ही अत्याधुनिक मशिन

    राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोजण्यांची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. त्याच्या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी युद्धपातळीवर विविध प्रयत्न सुरू केले होते. मोजणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी १२०० रोव्हर ही अत्याधुनिक मशिन खरेदी करण्यात आली. त्यापाठोपाठ भूकरमापकांची संख्या अपुरी असल्याने खासगी एजन्सीमार्फत भूकरमापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesMonsoon Prediction: जून महिन्यात ‘एल निनो’ सक्रिय होणार, सरासरीच्या 90 टक्के पाऊस; ‘आयएमडी’च्या ताज्या अंदाजामुळे शेतकरी अडचणीत
    आजमितीला राज्यात ३४०० इतके भूकरमापक आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यात लाखभर मोजण्या प्रलंबित होत्या. त्यांची संख्या कमी झाली आहे. मोजण्यांचा पूर्वीचा कालावधी हा ९० दिवसांवर आला असून, हा कालावधी एका महिन्यावर आणण्याचे भूमी अभिलेख विभागाचे प्रयत्न आहेत. खासगी भूमापकांची आता प्रत्येक जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पूर्वी दृतगती मोजणी ही ३० दिवसांत; तर नियमित मोजणी ९० दिवसांत होत होती. १०५ तालुक्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

    १४ दिवसांत मोजणी करण्यात येणार

    ‘महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, मोजणीचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रोव्हर्सची उपलब्धता, खासगी भूमापकांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यांत राज्यातील विविध विभागांतील जिल्ह्यांमध्ये कमी कालावधीत मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन सुरू केले आहे. राज्यात १९ जिल्ह्यांतील १०५ तालुक्यांमध्ये १४ दिवसांत मोजणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख विभाग, शैलेश नवाल यांनी ‘मटा’ला दिली.
    Maharashtra TimesPimpri Chinchwad News : पुणे विषारी दारु प्रकरण; CM देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, अल्कोहोलमध्ये मिथेनॉलसारखा पदार्थ; मोठी माहिती दिली

    १०५ तालुके कोणते?

    सध्या कमी प्रमाणात मोजणीची प्रकरणे दाखल होत आहेत, असे काही जिल्हे राज्यात आढळले आहेत. त्याचा अभ्यास करून भूमी अभिलेख विभागाने नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण या विभागांतील तालुक्यांची निवड केली आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड; तसेच नाशिक विभागात नाशिक, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, परभणी, जालना, लातूर; तसेच अमरावती विभागांमध्ये अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा