मुंबई: देशावर ‘ एल निनो ‘ची सावट असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने जून महिन्यासाठी आणि संपूर्ण मोसमासाठी नवा अंदाज जाहीर केला आहे. 2026च्या मान्सूनसाठी हवामान विभागाने दीर्घकालीन अंदाज (Long Range Forecast) जाहीर केला असून यानुसार यंदा सरासरीच्या 90 टक्केच पाऊस होण्याची शक्यता आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा आकडा 92 टक्के असेल असा अंदाज होता. पण आता हा आणखी खाली घसरल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.
काय परिणाम होणार?
आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या पत्रात जून महिन्यातचं ‘एल निनो’ सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हळूहळू एल निनोचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीहून 90 टक्के होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये चार टक्के कमी-जास्त परिणाम दिसू शकतो. यामुळे जून महिन्यात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उष्णतेच्या तीव्र लाटा राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
जून महिन्यात ईशान्य भारतातील पावसावर अधिक परिणाम दिसणार नसून सामान्य पाऊस होईल. पण मध्य आणि द्विपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. यामुळे महाराष्ट्रावर मोठा परिणाम होणार आहे. मध्य भारतावर याचा 43 टक्के परिणाम होणार असून द्विपकल्पात 45 टक्के परिणाम दिसून येणार आहे. जून 2026मध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा असतील.
सध्या प्रशांत महासागरात एल निनोची परिस्थिती निर्माण होत आहे. ही प्रणाली भारतात नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात पोहचण्याचा अंदाज आहे. याचा खरिपावर मोठा परिणाम होणार आहे.
खरिप पिकाला फटका बसणार
पश्चिम आशियातील संघर्षामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. भारताला महागाईच्या झळा बसत आहेत. कमी पावसामुळे शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या काही आठवड्यात एल निनोची परिस्थिती उद्भवणार असून देशात उष्णताही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी उत्पादनावर दबाव येऊ शकतो. वर्षाच्या उत्तरार्धात धान्या महागण्याची भीती आहे.
Monsoon Update: राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवरच, दोन आठवडे अल्प पावसाचा अंदाज; मुंबईत कधी दाखल होणार मान्सून?
यावेळी ईशान्य भारतात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पाऊस होणार आहे. पण देशातील शेतीवर अवलंबून असलेला भाग, म्हणजे मान्सून कोअर झोनमध्ये सरीसरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद केली जाणार आहे. याशिवाय हिंद महासागरातील द्विध्रुव ( Indian Ocean Dipole ) सध्या तटस्थ आहे. संपूर्ण मान्सून हंगामात हे तटस्थच राहणार असल्यामुळे फरासा परिणाम होणार नाही. हवामान विभाग जुलैमधील पावसाचा अंदाज जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा