• Sat. Jun 6th, 2026
    एकाच दिवशी एकाच परिसरात सात जणांचा अकस्मात मृत्यू, पुण्याच्या दापोडीत खळबळ, गावठी दारुची अफवा पोकळ, कारण काय?

    Pune Dapodi Mysterious Deaths : एकाच दिवशी एकाच परिसरातील सात जणांचा मृत्यू झाल्याने दापोडी परिसरात चर्चांना सुरुवात झाली असून गावठी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : दापोडी येथे गुरुवारी सात जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हे सर्व मृत्यू गावठी दारू प्यायल्याने झाल्याची अफवा पसरल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत तपासात गावठी दारू पिऊन एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले. दरम्यान, रात्री उशिरा आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने पोलिस आता यामध्ये विषबाधेचा प्रकार आहे का, या अनुषंगाने तपास करीत आहेत.

    पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१) आणि अकबर पठाण (वय ५२) यांच्यासह आनंद देसाई (वय ५३) आणि आनंदा निकाळजे (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

    कुणाचा नैसर्गिक मृत्यू, कुणाला चक्कर

    पांडुरंग फुगे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यांना कोणत्याही दवाखान्यात दाखल केले नाही. त्यांना दारू पिण्याचे व्यसन नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. विजय राठोड हे कंपनीत काम करीत होते. बुधवारी ते विश्रांतवाडी येथे गेले होते. तिथे चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
    Maharashtra TimesNida Khan : तुमच्या नव्या घरी एक गरोदर पाहुणी ठेवायची आहे, पटेलचा फोन; ‘त्या’ सकाळी हनिफभाईची बायको स्वतःचंच घर टीव्हीवर पाहून म्हणाली…

    भावाच्या मृत्यूचा धक्का

    भावाच्या मृत्यूचा धक्का बसून, राजेंद्र यांना फीट आली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र राजपूत यांना गुरुवारी चक्कर आली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यातील अकबर पठाण यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

    Sanjay Shirsat | संजय राऊतांचा जीव ना ठाकरे ना पवारांमध्ये मग कुणामध्ये? शिरसाट स्पष्टच बोलले

    सर्व नागरिक एकाच परिसरातील

    एकाच दिवशी एकाच परिसरातील सात जणांचा मृत्यू झाल्याने दापोडी परिसरात चर्चांना सुरुवात झाली. गावठी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या. पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क करून माहिती घेतली असता चार जणांना व्यसन नसल्याचे समोर आले. मात्र, रात्री उशिरा आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
    Maharashtra TimesVidhan Parishad : पार्थ पवार दिल्लीत तळ ठोकून, पुणे विधानपरिषदेची जागा NCP ला फिक्स? ‘तहा’त मोठं पद गमवावं लागण्याची चर्चा

    केवळ एकालाचा दारुचे व्यसन

    दापोडी येथे एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला. याबाबत काही अफवा पसरल्या असल्याने कसून चौकशी केली असता त्यातील चार जणांना दारूचे व्यसन नसल्याचे समोर आले आहे. केवळ एकाला दारूचे व्यसन होते. त्याबाबत चौकशी सुरू आहे. इतर माहिती अद्याप उपलब्ध नाही.
    – सचिन हिरे, सहायक पोलिस आयुक्त

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा