• Mon. Jun 15th, 2026
    मोटेगावकरच्या मुलाला प्रश्न पाठवले, लातूरच्या डॉ शिरुरेच्या चौकशीत मोठी माहिती, GOD तेजस शहाचं पुणे कनेक्शन समोर

    Tejas Shah : तेजस शहा हा पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी’त भौतिकशास्त्राचा शिक्षक असून त्याचं नाव अटकेत असलेली शिक्षिका मनीषा हवालदार हिच्या पतीच्या फोनमध्ये ‘गॉड’ या नावाने सेव्ह केला आहे.

    शिवराज मोटेगावकर, तेजस शहा (वर्तुळात) डॉ मनोज शिरुरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस हर्षदकुमार शहा आणि लातूरचा डॉक्टर मनोज शिरूरे यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने पाच दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तेरावर पोहोचल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) स्पष्ट केले.

    अटकेत असलेल्या निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न घेऊन ते लातूरमधील ‘आरसीसी’चा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलासह तीन विद्यार्थ्यांना देण्यात डॉ. शिरूरेची भूमिका असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    पेपरफुटीचे रॅकेट

    तेजस शहा हा पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी’त भौतिकशास्त्राचा शिक्षक आहे. त्याचं नाव अटकेत असलेली शिक्षिका मनीषा हवालदार हिच्या पतीच्या फोनमध्ये ‘गॉड’ या नावाने सेव्ह केला आहे. शहाने हवालदारकडून त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळविले होते. चौकशीत ही बाब निष्पन्न झाली. ‘सीबीआय’ने रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि लातूर येथील ‘रेणुकाई करिअर सेंटर’चा (आरसीसी) संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
    Maharashtra TimesArun Kumar Tiwari : आमच्या बाबांना एव्हरेस्टच्या कुशीतच विसावू द्या, गिर्यारोहकाने शिखराजवळ प्राण सोडले, बॉडी परत न आणण्याचा कुटुंबाचा मोठा निर्णय

    मोठी नावं समोर येण्याची शक्यता

    आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून मोबाइल संच, लॅपटॉप आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण केले जात असून, त्यातून अनेक मोठी नावे पुढे येण्याची शक्यता आहे, तसेच पेपरफुटीच्या बदल्यात झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी आरोपींच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू आहे.

    श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीनंतर प्रताप चिखलीकर यांची प्रतिक्रिया

    केमिस्ट्रीची शिक्षिकाही रडारवर

    पेपरफुटी प्रकरणात कथित मुख्य सूत्रधार असलेला पी. व्ही. कुलकर्णी, बिबवेवाडी भागातील ब्युटी पार्लरचालक मनीषा वाघमारे, जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे, भौतिकशास्त्राची शिक्षिका मनीषा हवालदार आणि शिक्षक तेजस शहा यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात रसायनशास्त्र विषयाशी संबंधित एका शिक्षिकेचीही चौकशी केली जात आहे.
    Maharashtra TimesNashik News : गरोदर आईसह बाबा बुडाले, चिमुकली धरणाकडे बोट दाखवत निघाली; कुस्ती स्पर्धा सोडून पैलवान धावले, पण चौघांनी प्राण गमावलेच

    नाशिककर शांतच!

    शिवराज मोटेगावकरने कोट्यवधी रुपयांची माया जमविली, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. नीट पेपरफुटीत सहभाग असलेल्या मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसचे होर्डिंग अद्याप दिमाखात शहराच्या मोक्याच्या जागेवर आहेत. तरीही नाशिककर शांतच आहेत. पुण्यात नागरिकांनी अशा होर्डिंगवर लगेचच बंदीसाठी उठाव केला. मात्र, नाशिकमध्ये आवाजही कुणी उठवत नाही. महापालिकेने हे होर्डिंग काढून टाकायला हवेत. मोटेगावकर प्राध्यापक नाही. तो पेपरफुटीतला संशयित आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा