• Sun. Jun 14th, 2026
    अभयारण्यातून ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’चा मार्ग; 5,043 खारफुटी बाधित होणार; नवा आराखडा सादर

    Virar-Alibaug Multimodal Corridor: विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे बाधित होणाऱ्या झाडांपैकी बहुतेक झाडं सुरक्षित राहतील किंवा त्यांची पुनर्लागवड होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर: विरार-अलिबाग मल्टीमोडाल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता पर्यावरणविषयक परवानगीची प्रतीक्षा आहे. य पहिल्या टप्प्या 96.41 किलोमीटर लांब मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 75 हेक्टर जागेवरील 5,043 खारफुटी बाधित होणार आहेत. परंतु, यापैकी केवळ 449 झाडं नष्ट होऊन उर्वरित बांधकामावेळी सुरक्षित राहतील किंवा पुन्हा दुसरीकडे लावली जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या मंजुरी मिळाल्याशिवाय मार्ग बांधता येणार नाही.

    अभयारण्य आणि राष्ट्री उद्यानातून मार्ग

    MSRDC विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी जून महिन्यापासून निविदा काढण्याच्या तयारीत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या रिंग रोड प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा फायदा होईल. खासगी गुंतवणुकीच्या आधारे हा संपूर्ण मार्ग तयार करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्य आणि करनाळा पक्षी अभयारण्यासह अनेक संवेदनशील क्षेत्रांमधून जातो. यामुळेच या प्रकल्पाला इतका विलंब झाला आहे.

    Maharashtra TimesPune-Ahilyanagar Highway: पुणे-अहिल्यानगर प्रवासात 45 मिनिटं वाचणार; देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाचा विकास, कुठून-कुठे असेल मार्ग?

    पर्यावरण मंत्रालयात सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पामुळे 5,403 खारफुटी बाधित होतील अशी माहिती दिली आहे. परंतु, नुकसान कमी होईल असा दावा MSRDCच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. एलिव्हेटेड मार्गासाठी ज्या ठिकाणी खांब उभारले जातील त्या भागांतील 449 झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. दरम्यान, इतर मार्गांवरील 730 झाडांवर तात्पुरता परिणाम होणार असून त्यांची पुन्हा लागवड केली जाणार आहे. दरम्यान, इतर 3,800 बांधकाम क्षेत्रात येत असले तरी त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही अशी माहिती एका अधिकार्‍याने Indian Expressशी बोलताना दिली आहे.

    नवीन आराखडा सादर

    वन्यजीवांसाठी अभयारण्ये आणि उद्यानामधून जाणारे मार्ग उन्नत असतील. यामुळे मार्गाखाली प्राणी आणि झाडं मुक्त राहतील. यापूर्वी या मार्गामुळे वन्यजीव बाधित होतील त्यामुळे ही संरचना बदलण्यात आली. या बदललेल्या आराखड्याला MCZMA कडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. आत राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि तज्ज्ञ मूल्यांकन समितीकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडूनही परवानगी घेणं आवश्यक आहे. दरम्यान, बाधित झालेल्या झाड्यांची तीन पट झाडांची लागवड केली जाईल अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesMHADA Mumbai Lottery: मुंबईत हक्काचं घर घेण्याची अंतिम संधी! म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस; ८८ हजार अर्ज दाखल

    विरार-अलिबाग कॉरिडोरला दोन टप्प्यात विभागले आहे. पहिला टप्पा वसई तालुक्यातील नावघरापासून उरण तालुक्यातील चिरनरपर्यंत असेल. या मार्गासाठी 31,793.47 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे वसई-विरार आणि नवी मुंबईपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. दरम्यान, दुसरा टप्पा पुढे अलिबागपर्यंत जोडणार आहे. खासगी आणि सरकारी भागीदारीच्या माध्यमातून या मार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे. हा खर्च पुढील 40 वर्ष प्रति किलोमीटर 8 रुपये टोल वसूल केला जाईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा