• Sun. Jun 14th, 2026
    Ahilyanagar Accident : सुट्टीत मामाच्या गावी, खेळत असताना काळाची झडप, भरधाव ट्रॅक्टर अंगावर कोसळलं; मामासह दोन्ही भाच्यांचा करुण अंत

    Ahilyanagar Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा करुण अंत झाला आहे.

    नेवासा तालुका ट्रॅक्टर अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यानं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले. एका क्षणात दोन कुटुंबांचा आधार हिरावून नेणाऱ्या या घटनेनं सोनई व खरवंडी गावांवर शोककळा पसरली आहे.

    नेमका कसा झाला अपघात?

    सोनई येथील दत्तनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय 16) व विजय गणेश दरंदले (वय 14) यांना शाळेला सुट्टी लागल्यानं ते काल बुधवारी सकाळी खरवंडी येथे आपल्या मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. दिवसभर आनंदात गेलेला हा क्षण सायंकाळी मात्र काळाने हिरावून घेतला. सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरात ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यानं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले.
    Maharashtra TimesTrimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर भक्तांसाठी काही दिवस बंद राहणार? सिंहस्थच्या कामांमुळे निर्णय घेतला जाण्याची शक्यता

    ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढलं

    अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. नेवासा येथे शवविच्छेदनानंतर सायंकाळी रामेश्वर मराठे यांच्यावर खरवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक व विजय या दोन्ही भावांवर सोनई येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील वातावरण सुन्न झालं होतं.
    Maharashtra TimesSolapur Crime : सासरचा छळ असह्य, दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन आयुष्य संपवलं, आधी लेकराची बॉडी सापडली नंतर आईची
    त्यामुळे या भीषण दुर्घटनेनं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिषेक व विजय हे प्रगतशील शेतकरी अर्जुन पाटील दरंदले यांचे नातू तसेच माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब दरंदले यांच्या कुटुंबातील होते. तर रामेश्वर मराठे हे बाळासाहेब मराठे यांचे एकुलते एक पुत्र होते. दुसरीकडे गणेश दरंदले यांनाही अभिषेक व विजय हीच दोन मुलं होती. त्यामुळे या भीषण दुर्घटनेनं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सोनई आणि खरवंडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झालं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा