नागपुरात 24 हजार 322 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत त्यांनी काळजी करु नये. त्यांचे नाव पुढच्या यादीत येईल, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 62 हजार 748 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 24 हजार 322 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. उर्वरित अर्जांची पडताळणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांची नावे पुढील यादीत समाविष्ट केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज या योजनेसाठी पात्र राहणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी उर्वरित रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाकडून पात्र असलेली दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांचे ॲग्रीस्टॅक आयडी तयार करण्याचे आवाहन
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ॲग्रीस्टॅक आयडी संदर्भातही महत्त्वाचे आवाहन केले. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांनी ही नोंदणी पूर्णपणे मोफत करून द्यावी. या प्रक्रियेसाठी पैसे आकारल्याचे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे आयडीही रद्द केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसल्याचा दावा
कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा तसेच तहसील स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांकडून SIR मोहीमेबाबत माहिती
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या प्रगतीचाही आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 85.26 टक्के नोंदणी पूर्ण झाली असून, नागपूर दक्षिण मतदारसंघात 65 टक्के नोंदणी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील डिजिटायझेशनचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. काही भागांमध्ये प्रशासकीय अडचणींमुळे बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नागरिकांपर्यंत पोहोचू शकले नसल्याचे त्यांनी मान्य केले.
शहरातील सुमारे 800 मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल अधिकारी (BLO) उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक नागरिक शहराबाहेर गेले असून काही नव्याने स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या घरी बूथ लेव्हल अधिकारी(BLO) यांनी किमान तीन वेळा भेट देऊन अर्ज संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या नागरिकाच्या क्षेत्रातील बीएलओ परराज्यात गेल्याची घटना घडल्यास ती यंत्रणेची त्रुटी मानून तातडीने दुरुस्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत विविध माध्यमांतून सातत्याने जनजागृती सुरू असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि बूथ लेव्हल एजंट यांनीही अधिक सक्रिय होऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. एसआयआर मोहिमेसाठी आता अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने उर्वरित नोंदणी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न तीव्र केले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा