• Tue. Sep 15th, 2026

Heavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

महाराष्ट्रात आगामी काळात चांगल्या पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या चार दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. पण 14 सप्टेंबरला राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. असं असलं तरी राज्यात मुसळधार पाऊस पडताना दिसत नाही. पण आता मुसळधार पावसाची प्रतिक्षादेखील पुढच्या काही दिवसांत संपणार असल्याचा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.

16 सप्टेंबरला कसा पाऊस पडणार?

“16 सप्टेंबरला विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस पडेल. 17 आणि 18 सप्टेंबरला पावसात थोडी वाढ होईल. मुंबई, पुण्यातही या दोन दिवसांत पाऊस पडेल. त्यानंतर 19 ते 24 सप्टेंबरच्या पावसाचे आगमन दक्षिण महाराष्ट्रातून होईल. ज्या भागांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही तिथे पाऊस पडणार आहे”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.

Maharashtra TimesShiv Sena Hearing : शिंदेंच्या वकिलांकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा, शिवसेनेच्या सुनावणीत अभूतपूर्व ट्विस्ट, वाचा A टू Z युक्तिवाद

19 ते 24 सप्टेंबर चांगल्या पावसाची शक्यता

“राज्यात 17 आणि 18 सप्टेंबरला बऱ्याच भागांमध्ये जोरात पाऊस पडणार आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, बारामती, दौंड, मानखटाव, इंदापूर, बीड, आष्टी, जामखेड, कर्जत, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना या भागांमध्ये 19 ते 24 सप्टेंबर काळात पााऊस पडेल. दक्षिणेकडे बाष्प सक्रिय झाल्यामुळे वातावरण तयार होईल. तिथून हा पाऊस सुरु होऊन राज्यातील इतर भागांकडे जाईल. हा पाऊस विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रातही राहील”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.

Maharashtra TimesDighi Shipbuilding Cluster : देशात सर्वात मोठं शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारणार, 27 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

’26 ते 30 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता’

“24 सप्टेंबरनंतर विशाखापट्टन येथे समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. त्यामुळे 26 ते 30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येणार आहे. हा पाऊस महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील पाऊस शेतकऱ्यांना तारणारा पाऊस असणार आहे”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

दुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी सुरु

दरम्यान, राज्य हवामान विभागाकडून पुढच्या चार दिवसांसाठी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढच्या चार दिवसांत अपेक्षित पावसाची शक्यता कमी आहे. पण पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या चार ते पाच दिवसांत राज्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल. हा पाऊस फार कमी वेळासाठी पडेल. पण तो विविध ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्याची पावसाची परिस्थिती पाहता दुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकारची तयारी सुरु झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.