Pune-Shirur Road: पुणे ते अहिल्यानगर महामार्गावरी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर मार्गाचा विकास मंजूर केला असून हा देशातील सर्वात लांब उन्नत मार्ग असेल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुणे-शिरूर मार्गाचा विस्तार होणार आहे. या मार्गाचे सहा पदरी उन्नत मार्गामध्ये रुपांतर होणार आहे. हा देशातील सर्वात लांब उन्नत मार्ग ठरणार आहे. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांपैकी एक मार्ग हा असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यासह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रवाशांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.
कसा असेल मार्ग?
राज्य सरकारने पुणे-शिरूर मार्गाच्या विस्ताराला हिरवा कंदील दाखवला आहे. हा संपूर्ण मार्ग 35.12 किलोमीटर लांब असेल. या मार्गाचं सहा पदरी महामार्गात रुपांतर झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासासाठी केवळ 45 मिनिटे लागणार आहेत. यामुळे या पट्ट्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, अवजड वाहनं आणि कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ होणार आहे. हा संपूर्ण मार्ग 53.4 किलोमीटर लांब असून यापैकी 35 किलोमीटर भाग उन्नत असेल. संपूर्ण प्रकल्पासाठी 7,300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मार्ग, कात्रज ते कोंढवा रस्त्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? महत्त्वाची अपडेट समोर
पुणे-शिरूर मार्ग , पुणे-अहिल्यानगर NH 753F महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे या मार्गाच्या विकासामुळे छत्रपती संभाजनगर आणि मराठवाड्यापर्यंत अंतर कमी होणार आहे. यासह समृद्धी महामार्गालाही थेट जोडणारा मार्ग तयार होणार आहे. येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकांड, शिक्रापूर आणि शिरूर परिसरांमधील मार्गावरील कोंडी फुटणार आहे.
या मार्गाच्या विस्तारासाठी 80 टक्के जमीन MSIDCच्या ताब्यात असल्यामुळे काम सुरू करण्यासाठी विलंब होणार नाही. काम सुरू करताच 4 वर्षांत हा मार्ग तयार होणार असल्याची शक्यता आहे. या मार्गामुळे पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. पुण्याहून मराठवाड्यातील प्रवास सुलभ होणार आहे.
Pune-Satara Highway: पुणे-सातारा प्रवास फक्त 1 तासात; महामार्गावर बहुमजली उड्डाणपुलांची योजना, शिरवळ, खंबाटकी घाटातील कोंडी फुटणार
डबल डेकर मार्गाचा विकास
पुणे मेट्रो लाइन 2चा विस्तार होत असलेली रामवाडी ते वाघोली मेट्रो लाइनही याच मार्गावर धावणार आहे. डबल डेकर उड्डाणपुलांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. पहिल्या टप्प्यावर पुणे-शिरूर उन्नत मार्ग असेल तर दुसऱ्या टप्प्यावर मेट्रो मार्गिका उभारण्यात येईल. पुणे-शिरूर प्रवास करणारे नागरिक नेहमीच वाहतूक कोंडीबद्दल तक्रार करत असतात. प्रवाशांचा तासांतास वेळ यामध्येच निघून जातो.त्यासह या मार्गावर अपघातांचे प्रमाणही मोठे आहे.पुणे-अहिल्यानगर महामार्ग वाघोली आणि शिक्रापूर मार्गे पुण्याला मराठवाड्याशी जोडतो.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा