• Sun. Jun 7th, 2026
    Nagpur News : हॉस्टेलमधील त्रासाबद्दल थेट CM फडणवीसांकडे तक्रार, वसतिगृह प्रशासनाकडून खोली रिकामी करण्याची नोटीस; विद्यार्थिनीने काय केलं?

    Nagpur Savitribai Phule Hostel Student Complaint to CM Fadanvis : नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतीगृहाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिथल्या एता विद्यार्थिनीला वसतिगृह सोडून जाण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

    नागपूर सावित्रीबाई फुले वसतिगृह विद्यार्थिनीची तक्रार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : वसतिगृहातील असुविधांविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला वसतिगृह प्रशासनाने नोटीस बजावल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला ‘नोकरी करत असल्याचे’, कारण देत वसतिगृह रिकामे करण्यास सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणाची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः त्या विद्यार्थिनीशी फोनवर संवाद साधून धीर दिला असून प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    संबधित विद्यार्थिनी गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून ती नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने आणि इतर विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसतिगृहातील समस्यांकडे लक्ष वेधले होते. विशेषतः कडाक्याच्या उन्हाळ्यात वसतिगृहात कुलरची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. तसेच विदर्भातील मुलींच्या वसतिगृहांसाठी सुमारे 600 कुलर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. मात्र, यानंतर प्रशासनानेच आपल्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesBeed Crime : लेकीच्या लग्नासासाठी लाखोंचा खर्च, आयुष्यभराची जमापुंजी लावली, बोहल्यावर चढण्याआधीच PSI नवरदेवाचा लग्नास नकार; बीडमध्ये काय घडलं?

    ‘जर इथे राहायचे नसेल तर घरी जा’

    तक्रारदार विद्यार्थिनी पुढे म्हणाली की, ‘आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आमच्या अडचणी मांडल्या. इतक्या उष्णतेत कुलर नसल्यामुळे राहणे कठीण झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली. पण त्याचा राग प्रशासनाने आमच्यावर काढला. वसतिगृहाच्या प्रशासन यांनी आमच्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, हे योग्य नसल्याचे सांगितले. तुम्हाला काही अडचण असेल तर समाजकल्याण विभागाकडे तक्रार करायला हवी होती, थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरज नव्हती, असेही आम्हाला सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर ‘जर इथे राहायचे नसेल तर घरी जा’, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
    Maharashtra TimesNanded MLC Seat : विधानपरिषदेसाठी अशोक चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचं नाव चर्चेत, वर्षानुवर्षे झटणाऱ्या ‘निष्ठावंतांना’ डावलणार!
    दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीला बजावण्यात आलेल्या नोटिशीत ती नोकरी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, तिने हा दावा फेटाळून लावला आहे. ‘मी कुठेही नोकरी करत नाही. मी केवळ इंटर्नशिप करत आहे आणि तो माझ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्या प्रोजेक्टला गुण मिळतात, त्यामुळे ती करणे आवश्यक आहे’, असंही ती तरुणी म्हणाली. या संपूर्ण प्रकरणानंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिच्याशी संपर्क साधला, आणि तिला धीर देत सांगितले की, ‘घाबरण्याची गरज नाही, मी प्रशासनाशी बोलतो’, असे आश्वासन त्यांनी दिल्याचं संबंधित विद्यार्थिनीने सांगितलं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा