• Thu. Jul 30th, 2026

    Rain News: मराठवाड्याला पावसाने झोडपलं, पुढील दोन दिवस ३ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा इशारा

    Rain News: मराठवाड्याला पावसाने झोडपलं, पुढील दोन दिवस ३ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा इशारा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासात विभागात १४.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७१.४० टक्के झाला आहे.

    मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे विभागाला दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना ५.१, बीड ६.२, लातूर १९.३, धाराशिव ३.४, नांदेड ३५.५, परभणी १४.१ आणि हिंगोली २०.१ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. विभागात एकूण १४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत सरासरी ३१४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना अवघा २५८ मिमी पाऊस झाला आहे. विभागातील पावसाची टक्केवारी ८२.१ आहे. पावसाच्या तुटीमुळे चिंता निर्माण झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्रीपासून मोठा पाऊस सुरू आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीजपाऊस असून सिल्लोड, पैठण, सोयगाव, फुलंब्री तालुक्यात अधिक पाऊस आहे. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेवटच्या टप्प्यातील पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून लातूर जिल्ह्यात पिकांना भांड्याने पाणी घालण्यात येत होते. या पावसामुळे पिके तरारली आहेत.

    जालना जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. जालना शहरात रस्त्यांवर पाणी साचले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पावसाचे पाणी साचले होते. तर एसबीआय स्कूलसमोर गटारीचे पाणी वाहत असल्यामुळे पादचारी, वाहनचालकांची गैरसोय झाली. मुर्गी बेस रोड परिसरात पाणी तुंबले होते. कन्नड तालुक्यात जुलैअखेर सरासरीच्या ९२ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने नदी-नाले कोरडे आहेत. खुलताबाद तालुक्यात तीन दिवसांपासून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाच्या सरी दिवसभर कोसळत होत्या. काही गावात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी देण्यात आली. बीड जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता.

    नांदेड जिल्ह्यात मुसळधार

    प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी गुरुवारी दुपारी जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी चारपर्यंत ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलांवर दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत असल्याने पुलांवरून पायी किंवा वाहनाने जाण्याचे धाडस करू नये. तसेच नदीकाठावरील पर्यटनस्थळांवर निश्चित सुरक्षित मर्यादेपलीकडे जाऊ नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed