• Fri. Jun 5th, 2026

    नागपुरकरांसाठी बातमी! अनेक भागांत आज वीजपुरवठा राहणार बंद; देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणाचा निर्णय

    नागपुरकरांसाठी बातमी! अनेक भागांत आज वीजपुरवठा राहणार बंद; देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणाचा निर्णय

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर: मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे आज, बुधवारी सिव्हील लाइन्स विभागातील क्लार्क टाऊन या वीज वाहिनीबरोबरच काँग्रेसनगर व बुटीबोरी विभागातील काही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बाधित राहणार आहे. यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंतच्या काळात बंद राहणार आहे.

    महावितरणच्या माहितीनुसार देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काँग्रेसनगर विभागातील पांढराबोडी, ट्रस्ट लेआउट, देवतळे लेआउट या भागात सकाळी ७.३० ते १०.३०, तर अजनी ते ऑरेंज सिटी चौक, देवनगर, सावरकरनगर, एलआयसी कॉलनी या भागात सकाळी ७ ते १० या वेळेत वीजपुरवठा बंद राहील. त्याचबरोबर तेलंगखेडी, मरारटोली, पीएनटी कॉलनी, कर्वेनगर, उज्ज्वलनगर, पावन भूमी, पर्यावरणनगर, श्रीरामनगर, कॉस्मोपॉलिटन, सरस्वती विहार, लोखंडेनगर, पठाण लेआउट, संभाजीनगर, भांगे लॉन, भाग्यश्री लेआउट, कॉसमॉस टाऊन, द्रोणाचार्यनगर, गोरले लेआउट या भागात सकाळी ७ ते ११ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

    ‘चंद्रपूर-गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रीचेबल, प्रत्येकाला 5 लाख देऊन फोडले’, Vijay Wadettiwar यांचा गंभीर आरोप
    तर सकाळी ८ ते ११ या वेळेत सुजाता लेआउट, गांधी बिल्डर, अग्ने लेआउट, स्वावलंबीनगर, सरस्वतीनगर, दीनदयाळनगर या भागात वीज राहणार नाही. स्वागत प्राणी संग्रहालय, ऐश्वर्या लेआउट, शिवशक्ती लेआउट, सीजीएचएस सोसायटी, सोनेगाव या भागात सकाळी ७.३० ते १० या वेळेत, तर हिरणवार लेआउट, आनंदनगर, घरकुल परिसर या भागात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत काही भागात वीज बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत गायत्रीनगर, परसोडी, दत्त मंदिर, श्रीनगर, हनुमान मंदिर परिसर, गोपाळनगर, नाईक लेआउट, फायर क्वार्टर, विजयनगर, हिमाला प्रेस्टिज, शेवाळकर गार्डन, ईटीएस कॉलनी आणि आयटी पार्क या भागात वीजपुरवठा खंडित राहील.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: १० महिन्यांत मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधींचा दावा; मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर
    सिव्हील लाइन्स विभागात ७ ते ११ या वेळेत सिंधी कॉलनी, कडबी चौक, ख्रिश्चन कॉलनी, लुंबिनीनगर आणि क्लार्क टाऊन परिसरातील वीजपुरवठा बंद राहील. तर बुटीबोरी विभागात सकाळी ९ वाजेपासून करमतारा, सूर्यकिरण, हिंदुस्तान, जयस्वाल निको, कॅडेलरिस, रुची सोया, इन्व्हेंटरी आणि प्रीमियर इरिगेशन या औद्योगिक ग्राहकांचा, त्यानंतर दुपारी १ ते २.३० या वेळेत ए-झोन फेज २, एसझेड-झोन आणि एसएझेड फूड या भागातील वीजपुरवठा बाधित राहील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed