• Sun. Jun 14th, 2026
    साठेबाजांवर कठोर कारवाई! इंधनाच्या कृत्रिम टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गृह विभागाला आदेश

    मुंबई : राज्यात पेट्रोलबाबत सरासरी मागणीपेक्षा २३ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोला येथे तर १५४ टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. तरीही टंचाईसदृश स्थिती तयार होत आहे. त्यामुळे इंधनाची साठेबाजी होत असल्याचा दाट संशय असून साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुरवठा तसेच गृह विभागाला दिले आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

    विदर्भ आणि मराठवाड्यात इंधनाची टंचाई असून पेट्रोलपंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी इंधनाची कृत्रिम टंचाई खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगतानाच साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. ‘सरासरीपेक्षा पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. मात्र, या मागणीची पूर्तता केली जात आहे.

    ‘राष्ट्रवादीच्या बैठकीत अजिबात वाद नाही, मी फक्त बोललो मुद्द्याचं बोला’, Chhagan Bhujbal यांचं स्पष्टीकरण
    पेट्रोलच्या मागणीत २३ टक्क्यांनी तर डिझेलच्या मागणीत ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोल्यात १५४ टक्क्यांहून जास्त पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना डिझेल मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. व्यावसायिक वापराच्या इंधनाची मागणी कमी होताना दिसत आहे. सर्वसाधारण मागणीचे इंधन व्यावसायिक वापराकडे वळविण्यात येत आहे का, याची चौकशी करत आहोत’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

    विरोधकांना टोला
    कांद्याच्या दरावरून काही लोक विनाकारण राजकारण करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. ‘कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळयात अश्रू येणार नाहीत. अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महायुतीचे सरकार कांद्याबाबत संवेदनशीलतेने काम करत आहे. विरोधकांची केवळ ‘फोटो अपॉच्र्युनिटी’ सुरू आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, ‘प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. त्यांनी अधिक जबाबदारीने बोलले पाहिजे आपण कोणाबद्द बोलत आहोत, काय बोलत आहोत, याचे भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचे स्थान दाखवेल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

    Maharashtra TimesEknath Shinde : ‘कांदा प्रश्नावर उद्या दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक’, तर सपकाळांवर संताप, ‘भाई’ गरजले
    कांदाप्रश्नी सरकार संवेदनशील
    कांद्याच्या दराबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून १५ रुपये केल्याचे सांगितले. दरनिश्चितीबाबत केंद्र सरकारला विनंती केली असून बुधवारी केंद्र सरकारसोबत बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    पेट्रोल, डिझेलच्या मागणीत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे. मात्र, या मागणीची पूर्तता केली जात आहे. कुठेही इंधनाची टंचाई नाही. इंधनाची साठेबाजी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed