• Sun. Jun 14th, 2026
    Dombivli Crime: 140 तरुणींना ‘प्रेमाचा’ फास; त्यांच्या नावावर लाखोंचं कर्ज काढणारा ‘इन्स्टा’वरील ‘आदर्श’ भामटा जेरबंद

    Dombivli Crime: फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तरुणींशी मैत्री करून प्रेमाचं नाटक करत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचं कर्ज काढणाऱ्या आदर्श म्हात्रेला डोंबिवली पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत १४० हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    डोंबिवली: फेसबुक-इन्स्टाग्रामवर ओळख वाढवायची, प्रेमाचं नाटक करायचं आणि विश्वास जिंकून तरुणींच्याच नावावर लाखो रुपयांचं कर्ज काढून फरार व्हायचं, सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल १४० हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील फसवणुकीचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. आदर्श म्हात्रे हा मूळचा पनवेल परिसरातील रहिवासी आहे. सोशल मीडियावर तरुणींशी मैत्री करून त्यांच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करायचा. त्यानंतर लग्नाची आणि भविष्यातील आयुष्याची स्वप्नं दाखवत संबंधित तरुणींचा पूर्ण विश्वास संपादन करायचा. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांचं कर्ज काढून आरोपी फरार होत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

    १४० हून अधिक तरुणी जाळ्यात

    पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपीने आतापर्यंत १४० हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवल्याचं निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश महिला उच्चशिक्षित असून त्या कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    ११ महिलांनी दाखवली हिंमत

    या प्रकाराला कंटाळून आतापर्यंत ११ महिला आणि तरुणींनी पुढे येत पोलिसांकडे अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेक महिला बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

    Maharashtra TimesAhilyanagar Crime : ‘गुन्हा दाखल करा, अन्यथा जीव देऊ’; आई-मुलाचा संतप्त इशारा, एकाचा मृ्त्यू, अहिल्यानगरमध्ये काय घडलं?

    नवी मुंबईत अटक

    याआधीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केली होती. त्यावेळी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या पाहिल्यानंतर डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने धाडस दाखवत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं.

    सोशल मीडियापासून सावध राहण्याचं आवाहन

    या घटनेनंतर सोशल मीडियावरील अनोळखी ओळखी, प्रेमसंबंध आणि आर्थिक व्यवहारांबाबत सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. आरोपीकडून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा