• Sat. Jun 6th, 2026
    ‘राष्ट्रवादीच्या बैठकीत अजिबात वाद नाही, मी फक्त बोललो मुद्द्याचं बोला’, Chhagan Bhujbal यांचं स्पष्टीकरण

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. निधी वाटपाच्या वादावर आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदार, मंत्री आणि प्रमुख नेत्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या चर्चांवर अखेर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी वाद झाला नाही तर आपण केवळ मुद्द्याचं बोला असं तटकरेंना बोलल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

    महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निधीवाटपाच्या वादावर काय ठरलं?

    “जे मंत्री आहेत त्यांनी 30 टक्के निधी ठेवावा आणि महायुतीच्या सर्व आमदारांना इतर निधी वाटप करावा. आम्ही सांगितलं 15 टक्के ठेवा आणि बाकीचा निधी सर्व आमदारांना द्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, नाही फक्त 10 टक्के निधी ठेवा. बाकीचा सर्व निधी आमदारांना वाटप करा, अशी चर्चा आजच्या बैठकीत झाली. रस्ते, रस्त्याची कामे याबाबत सगळ्यांना न्याय मिळेल अशी चर्चा आजच्या बैठकीत झाली”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

    “महामंडळांमध्ये A, B, C असे वर्गीकरण केले आहे. त्या वर्गीकरणात भाजपला आमदारांच्या संख्येनुसार 48 टक्के, शिवसेनेला 29 टक्के आणि राष्ट्रवादीला 23 टक्के महामंडळ मिळणार आहेत. आमच्या वाटेला 42 महामंडळ येणार आहेत. आम्हाला, भाजपला किंवा शिवसेनेला कोणती महामंडळ पाहिजेत याची यादी पुढच्यावेळेला आम्ही एकत्रित करणार आणि वाटाघाटी करुन निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

    “एसईओचे सुद्धा असंच वाटप होणार आहे. याची माहिती सर्व पालकमंत्र्यांना झाली पाहिजे म्हणून सर्व पालकमंत्र्यांना आज इथे बोलावलेलं होतं. त्यांना हे सगळं समजावून सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: आदेश दिला आहे, कुणीही शिस्तीचं पालन टाळता कामा नये”, असं त्यांनी सांगितलं.

    “आम्हाला आमच्या आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ मिळणार. फंड सर्वांना सारखा मिळणार. पण टोटल कमीच येणार. कारण 135 आमदारांना अधिकचाच मिळणार. आमचे 40 आमदार आहेत. निधीचे वाटप आमचे नेते करतील. त्यांच्याकडे निधी जाईल आणि ते निधीचे वाटप करतील”, अशी माहिती भुजबळांनी दिली.

    राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

    राष्ट्रवादीच्या बैठकीत तुमच्यात आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी “अजिबात काही वाद झाला नाही. मी म्हटलं मुद्द्यावर बोला रे. आता वेळ होतोय. आम्हाला जायचं आहे. आमची आठ वाजता महायुतीच्या समन्वय समितीची मीटिंग आहे. आपण जास्त बोलत बसलो तर आम्हाला बैठकीला लवकर या असं सांगण्यासाठी फोन यायला लागले. त्यामुळे मुद्द्याचं बोलाना. आपल्याला काय पाहिजे, काय करायचं आहे ते सांगाना”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

    वाद काही नाही. ते बोलत होते. मी म्हटलं, लवकर सांग. आम्हाला जायचं आहे. आमचे फोन येत आहेत. काय ते लवकर आटोप. काही खडाजंगी अजिबात झालेला नाही. फक्त आम्हाला सारखे फोन येत होते म्हणून मी सांगितलं की लवकर आटोप, आम्हाला जायचं आहे. एवढाच विषय आहे. चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार भांडण झाले तर हे चुकीचं आहे, अशी भूमिका भुजबळांनी मांडली.

    राष्ट्रवादीच्या बैठकीत एकला चलोचा नारा दिला का? असा प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावर त्यांनी हे चुकीचे आहे, असं म्हटलं. “एकला चलोचा कुणीही नारा दिलेला नाही. उगीच उफवा पसरवू नका. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की, जूनच्या 10 तारखेला आपण सगळे एक आहोत, कुठेही आपण फुटलेलो नाहीत, आमची शक्ती तशीच आहे हे दाखवण्याची एक संधी कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल. हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे. सगळ्या आमदारांना सांगितलं की, तुम्ही बाहेर जावून सांगा की, आम्ही सर्व एक आहोत. 20 फुटले, 30 तिकडे गेले असं काहीही झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed