• Sat. Jun 6th, 2026

    डिझेल दिले जात नसल्याची तक्रार, पालकमंत्री Sanjay Shirsat यांची थेट पेट्रोल पंपावर धडक, झाडाझडती अन् फोनाफोनी, काय-काय घडलं?

    डिझेल दिले जात नसल्याची तक्रार, पालकमंत्री Sanjay Shirsat यांची थेट पेट्रोल पंपावर धडक, झाडाझडती अन् फोनाफोनी, काय-काय घडलं?

    राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे डिझेस दिले जात नसल्याची तक्रार मिळाल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट पेट्रोल पंपावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डिझेल दिले जात नसल्याबाबत तक्रार पाप्त होताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी साजापूर येथील एका पेट्रोलपंपावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धडक मारली. पालकमंत्री पंपावर पोचताच शेतकऱ्यांनी त्यांना ‘घेराव’ घालत तक्रारींचा पाढा वाचला. पंप बंद असल्याने आणि जबाबदार कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने पालकमंत्र्यांनी यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत पालकमंत्र्यांनी पंपाची तपासणी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने पंपाची तपासणी केली असता 2300 लिटर डिझेल साठा शिल्लक असल्याचे समोर आले. पंपचालकांविरोधात कारवाईबाबत संबंधित तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांनी दिली.

    साजापूर परिसरातील एका पंपावर साठा असूनही डिझेल दिले जात नसल्याची तक्रार पालकमंत्री शिरसाट यांना एका नागरिकाने केली. माहिती मिळताच पालकमंत्री पंपावर पोचले. पंप बंद होता तसेच तिथे माहिती देण्यासाठी जबाबदारी कर्मचारी उपस्थित नसल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. उपस्थित शेतकरी, वाहनचालकांनी त्यांना घेराव घालत डिझेल मिळत नसल्याबाबत व्यथा मांडली.

    साठा असूनही डिझेल दिले जात नाही, शिल्लक साठा किती ? याची माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी उपस्थितांनी केल्या. सर्वांना थोड्या फार प्रमाणात तरी डिझेल द्यावे, अशी मागणी केली. प्रतीक्षा करुनही पंपचालकांपैकी कोणीही न आल्याने पालकमंत्र्यांनी पंपाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन दिले.

    साठा शिल्लक असूनही वितरित न करणे, पंप बंद करणे हे चुकीचे असल्याचे पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. जाणीवपूर्वक पंप बंद केले जातात. शेतकरी एका पंपावरुन दुसऱ्या पंपावर जातो. तिथेही डिझेल मिळाले नाही तर तो त्रस्त होणारच. संताप व्यक्त करणारच. असे का घडते, याच्या मागील कारणे शोधावी लागतील. जाणूनबुजून दिरंगाई करतात काय किंवा इतर ठिकाणी विकतात काय, याचा तपास करावा लागेल. साठा किती शिल्लक आहे, हे का दाखवत नाही? असा सवाल पालकमंत्री शिरसाट यांनी करुन जिल्हा प्रशासनास पंपाची तपासणीचे निर्देश दिले असून कुठेही चुकीचे आढळून येईल तेथे कारवाई होईल, असे त्यांनी नमूद केले.

    पुरवठा विभागाकडून तपासणी

    पालकमंत्री पंपावरुन निघून जाताच थोड्या वेळाने कर्मचाऱ्यांनी पंप सुरु करत पेट्रोलसह डिझेल वाटप सुरु केले. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने दोनच्या सुमारास पंपास भेट दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या आदेशाने पथकाने पंपाची तपासणी केली. आम्ही तिथे पोचलो त्यावेळी पंप सुरु होता. डिझेलचा 2300 लिटरचा साठा आढळून आला. पंपावरील यंत्रणेप्रमाणे दोन हजार लिटरवर रिझर्व्ह (इंधन साठा) लागत असल्याचे दिसून आले. तर तीन हजार लिटर पेट्रोलचा साठा आढळून आला. साठा असूनही पंप बंद करणे चुकीचे आहे. पुढील कारवाई बाबत लेखी स्वरुपात संबंधित तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. साजापूर परिसरातील अन्य तीन ते चार पंपांचीही पथकामार्फत तपासणी केल्याचे त्यांनी नमूद केले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा