• Fri. Sep 18th, 2026
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, BMC चा मल्टीमोडल बोगदे प्रोजेक्ट, पुढील 30 वर्षांच्या ट्राफिकनुसार स्ट्रॅटेजी

Mumbai News : मल्टीमोडल बोगद्यांच्या माध्यमातून मुंबईची वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात असून महत्त्वाची बाब म्हणजे, पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडतानाच याचा फायदा मेट्रो प्रवाशांना कसा होईल, याचेही नियोजन केले जात आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, त्यांचा प्रवास झटपट आणि निर्धोक व्हावा यासाठी सेवा वाहिन्यांचे जाळे असलेला ‘मल्टीमोडल बोगदे’ प्रकल्प मुंबई महापालिकेकडून राबविला जाणार आहे. या ‘मेगा प्रकल्पा’साठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली असून सहा महिन्यांत त्याचा अहवाल सादर होणार आहे.

पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडणार

मल्टीमोडल बोगद्यांच्या माध्यमातून मुंबईची वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडतानाच मल्टीमोडल बोगद्यांचा फायदा मेट्रो प्रवाशांनाही कसा होईल, याचेही नियोजन केले जात आहे.

वाहनांची संख्या वाढती

मुंबईत गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत असल्याचे चित्र पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिसते. मुंबईकरांचा प्रवास झटपट आणि निर्धोक व्हावा यासाठी अनेक पर्याय शोधले जात आहेत. उपनगरीय वाहतूक आणि मेट्रो यासारख्या वाहतूक व्यवस्था असतानाही रस्त्यावरील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ राहते. यावर महापालिकेने मल्टीमोडलचा पर्याय निवडला आहे.
Maharashtra TimesCrime News : पतीचे परस्त्रीशी संबंध, बाळंतीणीने मृत्यूला कवटाळलं, बॉडीशेजारी सात महिन्यांचं तान्हं बाळ शांत निजलेलं

वाहतूक आणि सेवा वाहिन्या एकाच बोगद्यातून

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुरात सेवा वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले होते. आताही विविध कामांमुळे सेवा वाहिन्यांचे नुकसान होते. त्यामुळे मुंबईतील सेवा वाहिन्यांचे जाळेही बोगद्यातून नेण्यात यावा, असा विचार या प्रकल्पातून पुढे आला. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि सेवा वाहिन्या एकाच बोगद्यातून नेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांवरून Gulabrao Patil यांचं वादग्रस्त विधान, ‘वीजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल…’

तीस वर्षांचं प्लॅनिंग

हा बोगदा पुढील ३० वर्षाच्या वाहतुकीला समोर ठेवून बनवला जाईल. बोगदा नेमका कसा हवा, त्याचे संरखेन कसे असावे, त्याचा खर्च, त्याचे फायदे इत्यादी कामे या सल्लागाराकडून केली जातील. पुढील वर्षात या कामासाठी निविदा काढण्याचे नियोजन आहे.

– महापालिकेचा मेगा प्रकल्प
– सल्लागाराकडून सहा महिन्यांत अहवाल
– वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करण्याचा प्रयत्न
– पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग, फ्री वेला जोडणार, मेट्रो प्रवाशांनाही दिलासा मिळणार
Maharashtra TimesLost Child Found : प्रिती गुप्ता कहाँ है? आप का बच्चा यहाँ है! जंतर मंतरच्या गर्दीत लहानगा हरवला, तरुणाईने Gen Z स्टाईलमध्ये आईबाप शोधले

असे असेल चित्र…

– मल्टीमोडल बोगद्यांतून वाहतुकीला मार्ग करतानाच सेवा वाहिन्यांचेही जाळे असेल.
– सागरी किनारा मार्ग, ईस्टर्न फ्रीवे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि इतर महत्वाचे मार्ग या भूमिगत बोगद्याशी जोडले जातील, जेणेकरून बोगद्यातून वाहने थेट त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील.
– मुंबईतील वाहतुकीला दिलासा मिळू शकणार आहे.
– मेट्रोतून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर जाऊन या बोगद्यातून प्रवास करून मेट्रो प्रवाशांचा प्रवास वेळ कसा वाचेल, यादृष्टीनेही प्रयत्न केले जाणार आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा