• Sat. Jun 6th, 2026
    Election Commission : मतदार यादीत तुमचं नाव आणि पत्ता बदलायचा आहे? निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

    अनेकांना मतदार यादीत आपलं नाव,फोटो किंवा पत्ता बदलायचा असतो. पण त्यांना प्रक्रिया माहिती नसते. असं असलं तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी हे घरोघरी जावून याबाबत विचारपूस करत माहिती घेतात आणि याबाबतची कामे करतात. निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असणाऱ्या या प्रक्रियेबाबत स्वत: राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी माहिती दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी माहिती दिली. मतदार याद्यांबाबत आगामी काळात महत्त्वाचं काम केलं जाणार आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. “आम्ही दरवर्षी रिवीजनसाठी येतो, त्यावेळी विचारतो की, आता असलेल्या यादीमध्ये तुम्हाला काही बदल करायचा आहे का? तुमचा पत्ता बदलला का? तुमचा फोटो बदलायचा आहे का? लग्न झाल्यानंतर तुमचं नाव बदलायचं का? असे काही बदल करायचे असतील तर आम्ही फॉर्म भरतो. बदल नसेल तर फॉर्म भरत नाही हे आमच्या समरी रिवीजनचे प्रोसिजर आहे”, अशी माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

    “मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षमध्ये काय करणार? 20 जूनला मतदार यादीमध्ये असलेल्या प्रत्येक मतदाराचे एनोमरेशन फॉर्म तयार करण्यात येईल. म्हणजे 20 जूनला मतदार यादीत असलेल्या मतदारांचे नाव, त्यांचा पत्ता आणि सर्व एनोमरेशन फॉर्ममध्ये प्रिंट करुन मिळणार. ते प्रत्येक लोकांच्या घरी घेऊन येणार. त्याला दोन प्रश्न विचारण्यात येणार. आज तुम्हाला दाखवत असलेली माहिती बरोबर आहे का किंवा त्यामध्ये बदल झालेली आहेत का? बदल असू शकतात. हे सर्व बदल करण्यासाठी संधी देण्यात येते”, अशी माहिती त्यांनी दिली.

    “आम्ही चार प्रश्न विचारतो. संबंधित मतदार येथून दुसरीकडे कुठे गेला आहे का ते कुणाला माहिती नाही? मग तो गैरहजर म्हणून नोंद करतो. मतदार दुसरीकडे शिफ्ट झाला आहे का? त्याची नोंद घेतो. मृत्यू झाला असेल तर मृत्यूचे प्रमाणपत्राची प्रत घेऊन प्रक्रिया करतो. तसेच ड्युप्लिकेट असेल तर कारवाई करतो. ड्युप्लिकेट नावे शोधण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे. नाव जुळत असतील तर सगळे तपासायचे असते आणि फोटो सिमिलर एन्ट्रीसचे नवीन प्रयत्न सुरु आहेत”, अशीदेखील माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

    “निवडणूक आयोग ही महत्त्वाची कामे राज्यात करणार आहे. त्यासाठी राज्यात 1 लाख 253 BLO कामावर असणार आहेत. काम मोठे असल्याने BLO ला मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही सूचित केले आहे. काम जास्त असेल तर इतर फिल्ड लेव्हल वर्कर त्यांच्यासोबत काम करणार आहेत. या प्रोग्रामासाठी प्रशिक्षण 20 ते 29 जूनमध्ये होणार”, असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं.

    “आपल्याला माहिती आहे की, आपल्या राज्यामध्ये घरोघरी जावून जनगणना सुरु आहे. म्हणून राज्याने विनंती केली होती की, जनगणनाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने SIR चे काम सुरु करु नये, अशी विनंती केली आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने ते मान्य केलं आहे. 30 जून पासून 29 जुलैपर्यंत आमचे BLO घरोघरी येणार आहे. या वेळात आपल्या मतदारांनी काय माहिती द्यावी हे फार महत्त्वाचे आहे”, असं एस. चोक्कलिंगम म्हणाले.

    “आपण 2002 ते 2004 मध्ये SIR झाले तेव्हा कुठे होता? याची माहिती देणं आवश्यक आहे. त्याला आपण मॅपिंग म्हणतो. ते काम आम्ही अंतर्गत दोन महिन्यांपासून करत आहोत. त्यामध्ये आजपर्यंत 72 टक्के मॅपिंग पूर्ण झालेले आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच 9 कोटी 86 लाख मतदारयाद्यांच्या नोंदीची पडताळणी होणार असून प्रारुप मतदार याद्या 5 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा