Raigad fort foot route: शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगड किल्ल्यावर 30 आणि 31 मे रोजी पायरी मार्ग पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय धोकादायक दगड हटवण्यासाठी घेण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनाने अधिकची काय माहिती दिली आहे?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड: किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार दि. 26 जून 2026 या रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरीता राज्यातील मोठयाप्रमाणात शिवभक्त नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठी किल्ले रायगडावर चढण्या-उतरण्यासाठीच्या पायी मार्गावरील वाटचाल दि.30 मे व 31 मे 2026 या दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड-अलिबाग किशन जावळे जारी केला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 मधील तरतूदींनुसार कोणत्याही आपत्कालीनप्रसंगी प्रतिबंधात्मक कार्य, सौम्यीकरण उपाय योजना, तात्काळ प्रतिसाद, मदत व पुनर्वसन, समन्वय इ. कार्य करावयाचे आहेत. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठयाप्रमाणात नागरिकांची उपस्थित राहणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोणत्या कारणाने घेतला हा निर्णय
कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला ) यांनी सन 2023 च्या किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या वेळी महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरुन पडलेल्या दगडामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षीच्या सोहळयाच्या अगोदर या ठिकाणाहून उंच कडयावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे. या कड्यावरील मोकळे दगड/दरड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी सहमती दर्शविली असून दि.30 व 31 मे, 2026 रोजी मोहिम राबविण्यात येणार आहे.
Abhijeet Dipke : ‘आमचं नाही ऐकलं तर अमेरिकेतही संपवू!’ CJP अध्यक्ष अभिजित दीपकेंना आधी ऑफर दिली; नंतर उघड धमकी, काय घडलं?
या मोहिमे दरम्यान पायी मार्गाने गड चढ-उतार करणाऱ्या व्यक्तींना हानी पोहचू नये, म्हणून या कालावधीमध्ये किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायी मार्गावरील वाटचाल पूर्ण बंद करण्याची कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांनी विनंती केली आहे.
रोपवे सुरु राहणार
कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड व अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी याकामी आवश्यक ती खबरदारी घेवून मोकळे मोकळे दगड हटविण्याचे काम पुर्ण करावे. जिल्हा पोलीस अधिक्षक, रायगड यांनी चित्त दरवाजा, नाणेदरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर (होळीचा माळ) येथे पायी मार्गावरील जाण्या-येण्याच्या प्रवेशव्दाराजवळ आवश्यक पोलीस बंदोबस्त लावावा. या कालावधीत रायगड रोप वे सुरु असणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा